US – इराण तणाव ! शेअर बाजारात ‘खळबळ’, गुंतवणूकदारांचे 3 लाख कोटी बुडाले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजारात मोठे नुकसान पाहायला मिळाले.मागील आठवड्यात अमेरिकेने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात इराणचे जनरल कासिम सुलेमानी मारले गेले. त्यामुळे इराण आणि अमेरिकेमध्ये तणाव निर्माण झाला आणि त्याचा परिणाम देशांतर्गत शेअर बाजारावर पाहायला मिळाला. सेंसेक्स 788 अंकानी कोसळून 40,676.63 वर बंद झाला. तर निफ्टी 234 अंकांनी घसरुन 11,993 च्या स्तरावर बंद झाला. शेअर बाजार कोसळल्याने दिवसाभरात गुंतवणूकदारांचे जवळपास 3 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.

गुंतवणूकदाराचे 3 लाख कोटी पाण्यात –
अमेरिका आणि इराणमधील तणावाचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला. अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदारांनी स्टॉक मार्केटमधून फायदा काढून घेतला. ज्यामुळे बाजारात मोठी घसरण झाली. बाजारात घसरण झाल्याने गुंतवणूकदारांचे 3 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. 3 जानेवारी 2020 मध्ये बीएसआयवर लिस्टेड एकूण कंपन्यांनी मार्केट कॅपिटल 1,56,87,770.65 कोटी रुपये होते तर आज 2,99,790.37 कोटी रुपयांनी कमी होऊन 1,53,87,980.28 कोटी रुपये झाले.

अमेरिकेने दिली चेतावणी –
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला चेतावणी दिली आहे की जर कोणतीही प्रत्युत्तराची भाषा केली तर इराणवर आजपर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करण्यात येईल.

सोन्याचे दर विक्रमी –
पश्चिम अशियामध्ये भू राजकीय तणाव वाढल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या दरात मोठी तेजी आली आहे. भारतात सोन्याच्या किंमती सोमवारी गगनला भिडल्या. भारतात सोन्यानं 41,000 रुपयांचा स्तर गाठला. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोनं सहा वर्षांनी एवढ्या उचांकीवर पोहचले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदी हाजिर भावात मोठी तेजी आली आहे. सोनं हाजिर भाव 2.3 टक्क्यांने वाढले आहे त्यामुळे 1,588.13 डॉलर प्रति औंस झाले आहे. जो एप्रिल 2013 नंतरच्या उच्चतम स्तरावर आहे. चांदीच्या दरात देखील तेजी आली आहे. चांदी 987 रुपयांच्या तेजीने 48,660 रुपयांवर ट्रेड झाली.

कच्चे तेल भडकले –
युद्धाच्या दिशेने पुढे सरकणाऱ्या परिस्थितीमुळे कच्च्या तेलात जोरदार तेजी आली आहे. अशियाई बाजारात ब्रेंट क्रूडचे दर 70 डॉलर प्रति बॅरल झाले आहेत. सप्टेंबरनंतर हा उच्चतम दर आहे. सौदी अरबच्या तेल विहिरीवर हल्ला झाल्यानंतर देशातील सर्वात मोठ्या तेल उत्पादक कंपनीने तेलाचे उत्पादन अर्धे केले होते.

अशियात बाजार कोसळले –
इराणबरोबर अमेरिकेचा वाढता तणाव पाहता ग्लोबल मार्केटमध्ये शांतता दिसून आली. शुक्रवारी अमेरिकी बाजारात देखील घसरणं पाहायला मिळाली. आज आशिया बाजारात कमजोरी पाहायला मिळाली. आठवड्याभरात 2 टक्क्यांनी घसरण झाली आहे. एसजीएक्स निफ्टीवर देखील दबाव पाहायला मिळाला. मिडिल ईस्टमध्ये वाढता तणाव अमेरिकी बाजारात पाहायला मिळाला. शुक्रवारी डाओ 233 अंकाने घसरुन बंद झाले. तर डाओ इंट्राडेमध्ये 360 अंकांनी घसरला. नेस्डॅक आणि एस अ‍ॅण्ड पी 500 अंकांनी बंद झाला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/