पुण्यात गरजूंसाठी ‘धान्य आणि कपडे कलेक्शन कॅम्प’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील महाविद्यालयीन तरुण-तरुणी यांचा “जागृती ग्रुप पुणे” प्रत्येक वर्षी जुन्या वस्तू जमा करून गरजू लोकांना देतात. जसे जुने-नवे कपडे, खेळणी, भांडी, पुस्तके, गरम कपडे, इतर उपयुक्त वस्तू आणि जीवनावश्यक वस्तू जमा करून अनाथ आश्रम आणि वृद्धाश्रम यांना देतात. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वार (मेन गेट) वर दिवसभर हा कॅम्प आयोजित केला जातो. २००९ पासून दरवर्षी हा उपक्रम राबविला जात आहे. आमचा हा उपक्रम गेले १० वर्षे अविरत चालू आहे. यावर्षी हा कलेक्शन कॅम्प फर्ग्युसन कॉलेजच्या मेन गेटवर, ३ मार्च २०१९ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आयोजित केला आहे.

आतापर्यंत अनेक जुन्या आणि नवीन वस्तू गोळा करून त्या गरजू संस्थांना देण्यात आल्या आहेत. या वर्षीची महाराष्ट्रातील भीषण दुष्काळग्रस्त परिस्थिती पाहता, शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी आपण खारीचा वाटा उचलण्यासाठी फुल ना फुलाची पाकळी समजून आम्ही यावर्षी प्रथमच धान्य कलेक्शन कॅम्प आयोजित करत आहोत. धान्य गोळा करून काही गावात धान्याचे वाटप करण्यात येणार आहे, हडपसर, हिंजेवाडी, पिंपरी-चिंचवड, कोथरूड, सहकारनगर, येरवडा अशा पुण्यातील विविध परिसरातील व्यक्ती दरवर्षी आम्हांला आपल्याकडील वस्तू घेऊन येतात. आम्ही पुणेकरांचे आभार मानतो त्यांच्या सहकाऱ्यांमुळे हा कॅम्प यशस्वी होत आहे.

यावर्षीही आपण असेच सहकार्य कराल अशी आशा आहे. उलट आपली जबाबदारी आहे की शेतकऱ्यांच्या या संकटकाळात त्याला आपण थोडीशी मदत करावी. म्हणून आपल्या शक्य असेल तेवढे धान्य देऊन मदत करावी. शेतकरी राजाचे धान्य त्यालाच देऊन थोडे सहकार्य करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. आम्ही जागृती ग्रुपच्या वतीने आवाहन करतो आपण सर्व पुणेकरांनी आम्हांला या उपक्रमात सहकार्य करावे.

आमच्या कॅम्प मध्ये जमा झालेले जुने-नवे कपडे, खेळणी, भांडी, पुस्तके, गरम कपडे, इतर उपयोगी वस्तू आणि जीवनावश्यक वस्तू या खालील अनाथाश्रम यांना देण्याचे आम्ही ठरविले आहे.

१) आशामंत फाउंडेशन माढा सोलापूर
२) मानव विकास संस्था, शेलापुरी ता. माजलगाव, जि.बीड

ही संस्था दिव्यांग मुले मुली तसेच दुर्बल घटकातील आणि आत्महत्या ग्रस्त शेतकरीचे मुले मुलीसाठी काम करते.

तसेच कॅम्प मध्ये गोळा झालेले धान्य आम्ही दुष्काळग्रस्त गावांतील गरजू शेतक-यांना देणार आहोत.

दरवर्षी कॅम्प यशस्वी करण्यासाठी अनेक स्वयंसेवकाचा हातभार लागतो. कॅम्पच्या अधिक माहितीसाठी आमच्या स्वयंसेवकांशी संपर्क साधावा.

पल्लवी – +91 77989 53631
सचिन -98608 78455
ज्योती -87883 83841

आयोजक : जागृती ग्रुप, पुणे
वेळ : ३ मार्च २०१९ (रविवार) सकाळी ७ ते सायंकाळी ५
स्थळ : फर्ग्युसन महाविद्यालय मेन गेट, एफ सी रोड, पुणे.

महत्वाच्या बातम्या –

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचा भंग, समझोता एक्सप्रेस रद्द 

लोकसभा निवडणूक : माढ्यातून शरद पवारांच्या विरोधात राजू शेट्टी रिंगणात ? 

पकडलेले ‘ते’ 2 डंपर, 1 ट्रॅक्‍टर गायब ; प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर 

हेलिकॉप्टर दुर्घटनेत नाशिकचा सुपुत्र शहीद 

विंग कमांडर अभिनंदनच्या सुटकेबाबत पाकिस्तानी परराष्ट्रमंत्र्यांचं मोठं वक्तव्य 

‘त्या’मुळे आजच गुंडाळणार अर्थसंकल्पीय अधिवेशन ?