सिझेरियन ऑपरेशननंतर पोटात राहिला होता कपडा, 25 दिवसानंतर काढला

भोपाळ : पोलीसनामा ऑनलाइन  –  सिझेरियन डिलिव्हरी केल्यानंतर एक महिला जेव्हा आपल्या घरी गेली तेव्हा तिला पोटदुखीचा त्रास होऊ लागला. जेव्हा तपासणी करण्यात आली तेव्हा समजले की, पोटात कपडा राहिला आहे. 25 दिवसानंतर महिलेचे पुन्हा ऑपरेशन करून पोटातून कपडा काढण्यात आला. हैराण करणारा हा प्रकार मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये घडला आहे.

दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, 23 ऑगस्टला गरोदर महिला मायाबाईला आरएस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. दुसर्‍याच दिवशी मायाबाईचे सिझेरिन ऑपरेशन झाले, ज्यानंतर तिने एका मुलाला जन्म दिला.

घरी पोहचल्यानंतर महिलेला पोटदुखीचा त्रास होऊ लागला. 31 ऑगस्टला सुद्धा ती आपल्या पोटाचे टाके काढण्यासाठी हॉस्पीटलमध्ये गेली होती आणि याबाबत डॉक्टरांना तिने सांगितले, परंतु त्यांनी गॅसमुळे पोटदुखी होत आहे, असे सांगून प्रकरण टाळले.

जेव्हा पोटदुखी वाढत गेली तेव्हा पुन्हा सोनोग्राफी करण्यात आली तेव्हा पोटात कपडा दिसला. यामुळे कुटुंबातील लोकांना धक्काच बसला.

यानंतर कुटुंबिय महिलेला दुसर्‍या हॉस्पीटलमध्ये घेऊन गेले आणि पुन्हा 25 दिवसानंतर ऑपरेशन करून महिलेच्या पोटातून कपडा काढण्यात आला. आता महिला धोक्याच्या बाहेर आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like