पुरंदरच्या पूर्व भागात ढगफुटी सदृश पाऊस

जेजुरी  : पोलीसनामा ऑनलाइन – पुरंदर (Purandar) मध्ये मागील आठवड्यात परतीच्या पावसाने हाहाकार माजवला होता. शासनाच्या वतीने पंचनामे करण्यासाठी बांधावर जात असतानाच,काल संध्याकाळी पुन्हा पुरंदरच्या पुर्व भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. आधीच्या पावसाने पिक गेले होती. आता शेतात ही नाळवे पडले आते.

काही ठिकाणी भिंती पडल्या आहेत तर आज दि .१८ रोजी पुरंदरच्या पूर्व भागात राजेवाडी आंबळे, गुरोळी, वाघापूर चौफुला, सिंगापूर परिसरात ढगफुटी झाली असून या ठिकाणी सर्व पिके पाण्यात गेली आहेत. बांध फुटले आहेत शेताचे शेततळे झाले आहेत. सर्व पिके पाण्यात गेली आहेत. सासवड यवत रस्ता राजेवाडी येथील ओढ्याच्या वर तीन ते चार फूट पाणी असल्याने बंद झाला आहे.

बळे येथील अनेक नालाबंधारे फुटले आहेत. राजेवाडी येथिल मारुती मंदिराची भिंत कोसळली आहे. ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागलेले आहेत. प्रशासनच्या वतीने सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी घरातून बाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले.