clove | सकाळी रिकाम्या पोटी 2 लवंग खा; अनेक आजारावर रामबाण उपाय

पोलीसनामा ऑनलाइन टीम – स्वयंपाकघरात लवंगाचा वापर अन्नाची चव वाढवण्यासाठी केला जातो. तसेच आरोग्याच्या बाबतीतही लवंगाचे (clove) सेवन फार फायदेशीर मानले जाते. आयुर्वेदात औषधी वनस्पती म्हणून लवंगाचा (clove) वापर केला जातो.

लवंग कसे वापरावे ?
खाण्याबरोबरच तुम्ही लवंगाचा चहा, भाजी, पुलाव, खीर बनवून पिऊ शकता. याशिवाय लवंगाचा काढा ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

झोपण्याआधी 2 लवंग चावून खा व १ ग्लास कोमट पाणी प्या. याचा तुम्हाला फायदा होईल.

1) मजबूत रोगप्रतिकार प्रणाली
लवंग ही एक प्रकारची रोग प्रतिकारशक्ती बूस्टर आहे, जी सर्दी-खोकला, घसा खवखवणे आणि ताप टाळण्यास मदत करते. यासाठी सकाळी रिकाम्या पोटी 2 लवंगा खा किंवा चहा बनवून प्या.

2) संक्रमणाचा धोका कमी होईल
त्यात एंटी-बैक्टीरियल आणि एंटी-फंगल गुणधर्म आहेत. जे कोरोना संक्रमणापासून बचाव करण्यासाठी उपयुक्त आहे यामुळे शरीरातील सर्व जीवाणू नष्ट होतात.

3) यकृत निरोगी ठेवा
त्यातील एंटी-इंफ्लेमेट्री गुणधर्म यकृतातील सर्व विषारी पदार्थ बाहेर टाकतात व यकृतातील जळजळ कमी करण्यास देखील हे उपयुक्त आहे.

4) छातीत जळजळ आणि पित्त
जर आपल्याला छातीत जळजळ किंवा पित्त असेल तर २ लवंगा चघळा. तसेच त्याचा चहा करून पिल्याने पोटाच्या समस्या देखील दूर होतात.

5) साखर पातळी नियंत्रण
त्याचे एंटी-ऑक्सीडेंट्स घटक रक्तातील ग्लूकोज नियंत्रित करतात. मधुमेहावरील रामबाण उपाय म्हणून त्यांचा उपयोग होतो. अशा वेळेस मधुमेहाच्या रुग्णांनी त्याचे सेवन खूप फायदेशीर ठरू शकते.

6) वजन नियंत्रित करा
लवंग चहा मेटाबॉलिक दर वाढविण्यात मदत करतो, ज्यामुळे वजन नियंत्रित राहते. तसेच हे चरबी बर्न करण्यास देखील उपयुक्त आहे.

Web Titel :- clove | amazing health benefits of clove

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aadhaar Update | तुमच्या आधार कार्डमध्ये चुकीचा मोबाईल नंबर आणि ई-मेल नोंदला गेलाय का, ‘या’ पद्धतीने तपासा

Today petrol price | पेट्रोल डिझेलच्या दरात आज पुन्हा दरवाढ; जाणून घ्या आजचे दर

Pune Crime | एमडी डॉक्टर सुजित जगतापने या अगोदरही लावला होता महिला डॉक्टरच्या बाथरूममध्ये स्पाय कॅमेरा