पोटदुखीसह ‘या’ 14 शारीरिक तक्रारींवर गुणकारी ठरते लवंग !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   लवंग खायला अनेकांना आवडत नाही. लवंग तीक्ष्ण आणि उग्र असते. त्यामुळं इच्छा असली तरी काहींना ती जिभेवर धरवत नाही. परंतु याचे अनेक गुणकारी फायदे होतात. आज याच फायद्यांबद्दल आपण माहिती घेणार आहोत.

1) लवंगात युजेनॉल असतं. यामुळं सायनस किंवा सर्दी सारख्या समस्या दूर होतात.

2) लवंग उष्ण गुणधर्माची आहे. त्यामुळं सर्दी किंवा खोकला येत असेल तर लवंग चघळावी. चहा करताना देखील त्यात एक दोन लवंगा टाकू शकता.

3) कफ विकारात लवंग खूप गुणकारी आहे.

4) पोटदुखी दूर करण्यास याची मदत होते.

5) सतत तहान लागत असेल तर लवंग खावी. यामुळं फायदा मिळेल.

6) दमा, उचकी, रक्तविकार असेल तर लवंग खावी. यामुळं आराम मिळतो.

7) लवंगाच्या तेलामुळं घसा, गळा, गाल, जीभ सर्व स्वच्छ राहतं.

8) सर्दीमुळं नाक वारंवार बंद होत असेल तर लवंगाच्या तेलाचे दोन चार थेंब रूमालावर टाकून ते हुंगावेत. यामुळं नाक मोकळं होतं.

9) जुनाट सर्दी असेल तर डोक्यावर लवंग, सुंठ आणि वेखंड यांचा लेप करू लावावा.

10) तोंडातून दुर्गंधी येत असेल तर लवंगाचं तेल आणि पाणी एकत्र करून त्यानं गुळण्या कराव्यात.

11) दात दुखत असेल तर लवंगाचं तेल, कापूस आणि किंचित तूप एकत्र करून कापसाचा बोळा दुखऱ्या दातावर ठेवावा. मात्र लवंग तेलाचं प्रमाण कमी असावं.

12) अनेकदा वृ्द्धांना बोलताना ठसका लागतो किंवा धाप लागते, अशा वेळी 1 लवंग चघळावी.

13) लवंग बुद्धी तल्लख ठेवते.

14) जेवण जास्त झालं तर लवंग चघळावी. पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.