Clubhouse यूजर्ससाठी वाईट बातमी ! डार्कवेबवर विकले जाताहेत 380 कोटी यूजर्सचे फोन नंबर !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही काही वेळातच वेगाने पॉप्युलॅरिटी जमवणार्‍या क्लबहाऊस अ‍ॅपचा (Clubhouse App) वापर करत असाल तर ही बातमी तुम्हाला अस्वस्थ करू शकते. कारण क्लबहाऊस यूजर्सचे (Clubhouse Users) लाखो फोन नंबर कथितप्रकारे लीक झाले आहेत आणि डार्क वेबवर विकले जात आहेत. ही माहिती सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट जितेन जैन यांनी दिली आहे. लोकप्रिय ऑडियो चॅट अ‍ॅपचा डेटासेट केवळ मोबाइल नंबर दाखवतो आणि कोणतीही इतर माहिती दाखवत नाही.

प्रमुख सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट जितेन जैन (Cyber ​​Security Expert Jiten Jain) यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, क्लबहाऊस यूजर्सचे 3.8 बिलियन (380 कोटी) फोन नंबर्स डार्कनेटवर विकले जात आहेत. यामध्ये यूजर्सच्या फोनबुकमध्ये असलेल्या लोकांचे नंबर आहेत ज्यांना सिंक केले गेले आहे. त्यामुळे अशी शक्यता आहे की, तुमचा नंबर सुद्धा या लिस्टमध्ये असू शकतो जरी तुम्ही क्लबहाऊसमध्ये लॉगिन केले नसेल.

मात्र, ऑडियो चॅट अ‍ॅपने अजूनपर्यंत कथित डेटा लीकच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. तर स्वतंत्र सुरक्षा संशोधक राजशेखर राजहरिया यांनी हा कथित क्लबहाऊस डेटा फेक असल्याचे म्हटले आहे. त्यांनी ट्विट करून लिहिले की, एक हॅकर कथित प्रकारे क्लबहाऊसच्या 3.8 बिलियन फोन नंबर्सची विक्री करत आहे. हे पूर्णपणे बनावट दिसत आहे. यामध्ये केवळ कोणत्याही नावाशिवाय आणि फोटोशिवाय केवळ मोबाइल नंबर दिसत आहेत. फोन नंबर्सची लिस्ट सहजपणे बनवली जाऊ शकते.

Web Title :-  Clubhouse | bad news for clubhouse users hackers selling 380 crore users phone number on dark web

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mann Ki Baat Today | ‘प्रत्येक नागरिकाने आज ‘भारत जोडो आंदोलना’चे नेतृत्व करावे’ – PM नरेंद्र मोदी

Kolhapur Rain | कोल्हापूरात रस्ता 15 फूट खचल्याने 20 गावांचा संपर्क तुटला; गगनबावडा तालुक्यातील अणदूर-धुंदवडे रस्ता खचला (व्हिडीओ)

कोल्हापूर – पुणे NH – 4 महामार्ग सद्यस्थिती सदरचा महामार्ग वाहतुकीसाठी अद्याप बंद आहे. पहा व्हिडिओ