CM Bhagwant Mann | पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या निवास्थानाजवळ आढळला बॉम्ब; प्रचंड खळबळ

0
161
CM Bhagwant Mann | Live Bomb Found Near Punjab CM Bhagwant Mann's house in Chandigarh
file photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (CM Bhagwant Mann) यांच्या चंदीगड येथील निवास्थानाजवळच बॉम्बशेल आढळल्याने प्रचंड खळबळ उडाली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि बॉम्बशोधक व रोधक पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी बॉम्बशेल आढळलेला परिसर सध्यातरी सील केला आहे. दरम्यान, बॉम्बशेल ज्या ठिकाणी आढळला आहे तेथून पंजाब आणि हरियाणा अशा दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे (CM Bhagwant Mann) निवासस्थान जवळ आहे. (Live Bomb Found Near Punjab CM Bhagwant Mann’s house in Chandigarh)

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थान परिसरात आंब्याची बाग आहे. त्याच परिसरात बॉम्बशेल आढळला आहे. सदरील परिसर हा हरियाणा आणि पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्यासाठी तयार करण्यात आलेल्या हेलिपॅडपासून 1 किलोमीटर अंतरावर आहे तर भगवंत मान यांच्या निवासस्थानापासून 2 किलोमीटर अंतरावर आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आणि बॉम्बशोधक व रोधक पथकाने बॉम्बशेल निकामी केला आहे. परिसरात नाकेबंदी करण्यात आली होती. बॉम्बशेल परिसरात कसा आला याबाबतचा तपास पोलिस करीत असल्याची माहिती चंदीगडमधील आपत्ती व्यवस्थापन विभागाचे वरिष्ठ अधिकारी संजीव कोहली यांनी दिली आहे. (CM Bhagwant Mann)

 

Web Title :- CM Bhagwant Mann | Live Bomb Found Near Punjab CM Bhagwant Mann’s house in Chandigarh

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shamna Kasim | आलिया भट्टनंतर आता ‘या’ अभिनेत्रीने दिली गुड न्यूज; लग्नाच्या तीन महिन्यातच दिली गुड न्यूज

Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ ट्वीटमुळे चांगलीच खळबळ; जाणून घ्या नक्की काय आहे ते ट्वीट

Ruhanika Dhawan | ‘या’ बालकलाकाराने केवळ वयाच्या 15 व्या वर्षी केले स्वतःचे घर खरेदी; पोस्ट वायरल