मुख्यमंत्र्यांची पहिली सभा चिंचवड मतदार संघात !

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या निवडणुकीतील पहिली जाहीर सभा चिंचवड विधानसभा मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ होणार आहे. गुरुवार दिनांक 10 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता हॉटेल अँबियन्स शेजारी, प्राधिकरण मैदान, काळेवाडी फाटा, कस्पटे वस्ती, वाकड येथे या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभा निवडणुकीतील पहिलीच सभा पिंपरी-चिंचवडमधील चिंचवड मतदार संघात होत आहे. याच मतदार संघात महायुतीमध्ये बंडखोरी झाली असून भाजपा उमेदवार लक्ष्मण जगताप यांची थेट लढत शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांच्याशी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री सभेत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Visit : Policenama.com