बारामतीत मुख्यमंत्र्यांचं ‘बुरे काम का बुरा नतीजा, सुन भाई चाचा आ भतीजा’ तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं ‘एकच वादा अजितदादा’ (व्हिडीओ)

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – शरद पवार यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांवर निशाणा साधला. पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी, काँग्रेसमध्ये रहायला कोणीही तयार नाही, बूरे कामों का बूरा नतीजा, सुनो भाई, चाचा आ भतिजा अशा खोचक शब्दात फडणवीसांनी पवारांवर टीकास्त्र सोडले. फडणवीस यांची महाजनादेश यात्रा सध्या बारामतीत आहे, तेथे जाहीर सभेत ते बोलत होते.

राष्ट्रवादीने फडणवीस यांच्या सभेच्या साऊंट सिस्टीम आणि फलकांच्या घेतलेल्या अक्षेपावर बोलताना फडणवीस म्हणाले, माझ्या स्वागत सभेचा राष्ट्रवादीने एवढा धसका घेतला की, कार्यक्रम स्थळावर असलेले साऊंट सिस्टिम, फलकांवर हरकत घेतली. परंतू फडणवीस यांनी सभेत पवार कुटूंबियांना चांगलेच धारेवर धरल्याचे दिसले.

जनसभेला विराट रुप दिल्याबद्दल फडणवीस यांनी बारामतीकरांचे आभार मानले. तीन हत्ती चौकात महाजनादेश यात्रा 4 वाजता पोहचली तेव्हा फडणवीस यांच्यासह चंद्रकात दादा पाटील, गिरिष महाजन, बाळा भेगडे, अमर साबळे, हर्षवर्धन पाटील उपस्थित होते.

एकच वादा अजितदादाच्या घोषणा –
बारामती काही ठिकाणी राष्ट्रवादीकडून फडणवीस यांना विरोध करण्यात आला. त्यावेळी जमलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ‘एकच वादा अजितदादा’ अशा घोषणा दिल्या. पेन्सिल चौकात फडणवीस भिगवण येथून महाजनादेश यात्रेत येताना राष्ट्रवादीच्या युवक कार्यकर्त्यांकडून पोलिसांना न जुमानता एकच वादा अजितदादा अशा घोषणा दिल्या. महाजनादेश यात्रा संपल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून त्या ठिकाणहून घोषणाबाजी करत फेरी काढली.

आरोग्यविषयक वृत्त –