राष्ट्रवादीत नुसती ‘आडवा-आडवी’ आणि ‘जिरवा-जिरवी’ ; सातारकरांच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी मी कटिबद्ध (व्हिडीओ)

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – आम्ही सत्तेत नसतानाही मागील पाच वर्षांत मुख्यमंत्र्यांनी साताऱ्याचा खरा विकास केला असे सांगत राष्ट्रवादीत मात्र विकासकामांपेक्षा आडवा-आडवी आणि जिरवा-जिरवीच चालू असते अशी टीका करत उदयनराजेंनी राष्ट्रवादीला घरचा आहेर दिला. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझे खूप चांगले मित्र असून राजकारणापलीकडे मैत्री आम्ही जपली आहे त्यामुळे मैत्रीखातर साताऱ्याच्या विकासाकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष दिल्याचे त्यांनी सांगितले. जलमंदिर पॅलेस सातारा येथे आज पत्रकार मित्रांशी संवाद साधताना उदयनराजे बोलत होते.

भाजप प्रवेशाविषयी तर्कवितर्क काढू नये :
भाजपाकडे सत्ता आहे म्हणून मी तिथं जाईन असा तर्क काढणं चुकीचे असून गरज असेल त्याप्रमाणे योग्य वेळी सातारकरांच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी मी कटिबद्ध आहे. त्यामुळे आता कोणीही कसलेही तर्कवितर्क काढू नये. सत्तेसाठी लाईन लावून उभं राहणे हा माझा स्वभाव नसून राजकारणात माझी बांधिलकी कायम माझ्या मतदारसंघाशी राहिली आहे. सत्ता असो नसो जनतेच्या सेवेत वाहून घेण्याचा माझा स्वभाव आहे असे उदयनराजेंनी यावेळी स्पष्ट केले.

रामराजे, शिवेंद्रराजे त्यांच्या मार्गाने जातील :
माजीआमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाविषयी विचारले असता ते माझे धाकटे भाऊ असून त्यांना मदत केलीच पाहिजे असे सांगत ‘ते छोटं मूल आहे, त्यांनी मांडीवर जरी काही केलं आपण तर मांडी कापत नाही’ अशी टिपण्णी उदयनराजेंनी केली. ते लाडके आहेत असून दाढी वाढविल्यामुळे आता ते छान दिसतायत असे म्हणत त्यांना पिक्चरमध्ये काम करण्याचा उपरोधक सल्लाही त्यांनी दिला.

रामराजे नाईक-निंबाळकर यांच्याविषयी विचारले असता ते वयाने आणि मानाने मोठे असून त्यांची आणि आमची बरोबरी करु नये अशी कोपरखळी देखील त्यांनी मारली. तसेच ते दोघेही त्यांना योग्य वाटेल त्याप्रमाणे त्यांच्या मार्गाने जातील, मला त्यांच्याशी जोडण्याचे काही कारण नाही असेही उदयनराजेंनी सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त –

 

You might also like