मुख्यमंत्र्यांसमोरच पंकजा मुंडेंनी मेटेंवर केली ‘ही’ टीका ! मुंडे – मेटे वाद पेटणार ?

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा बीड शहरात पोहोचली. ऐनवेळी आ.विनायक मेटेंनी देवेंद्र फडणवीस यांना हट्ट करून या यात्रेचे स्वागत बीड शहराच्या जवळ अहमदनगर – बीड रोड लगत काकडहिरा या ठिकाणी केलं. यावेळी मेटेंनी जोरदार शक्तीप्रदर्शनही केलं. लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघ सोडून संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीसोबत जाण्याची भूमिका शिवसंग्राम पक्षाच्या विनायक मेटे यांनी घेतली होती.

विनायक मेटे यांचं भाषण सुरू असताना पंकजा मुंडे आणि खा.प्रीतम मुंडे या महाजनादेश यात्रेच्या गाडीत बसून होत्या. यावेळी विनायक मेटेंच्या कार्यकर्त्यानी प्रचंड घोषणाबाजी केली. त्यानंतर पंकजा मुंडे व्हॅनमधून उतरून सभेच्या ठिकाणी पोहचल्या.

पंकजा मुंडेंनीही मग जाहीर भाषणात मेटेंचा चांगलाच समाचार घेतला. ‘मुख्यमंत्रीसाहेब तुमचा देवेंद्र तें नरेंद्र हा प्रवास सुखाचा व्हावा अशा शुभेच्छा देते. स्व. मुंडे साहेब गेल्यानंतर तुम्ही माझे गुरू आहात. द्रोणाचार्य यांनी अर्जुनापेक्षा कोणी वरचढ होवू नये म्हणून एकलव्यचा अंगठा मागितला होता. मात्र तो अर्जुनासाठी होता. मुख्यमंत्री साहेब तुमच्यासाठी मी एकलव्य होऊन अंगठा द्यायला तयार आहे. पण फक्त तो अर्जुनासाठी असावा इतर कोणासाठी नाही,’ असं म्हणत पंकजा मुंडे यांनी अप्रत्यक्षपणे मेटेवर शरसंधान साधलं आहे.

या संपूर्ण प्रकारामुळे बीड भाजपमध्ये पुन्हा एकदा मेटे – मुंडे वाद पुन्हा पेटणार असल्याचे दिसून आले. याचा परिणाम आगामी विधानसभेमध्येही मोठ्या प्रमाणावर दिसून येऊ शकतो.

आरोग्यविषयक वृत्त –