कर्नाटकात मराठी माणसावर होणारा अन्याय ‘अशोभणीय’, गरज भासल्यास न्यायालयात जाऊ : CM फडणवीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागात राहणाऱ्या मराठी माणसाला कित्येक वर्षांपासून जो लढा द्यावा लागत असून तो संपत नाही तो पर्यंत महाराष्ट्र शासन शंभर टक्के मराठी माणसांच्या पाठीशी आहे. तो भाग महाराष्ट्राचाच आहे असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. यावेळी ते सीमावासीयांच्या शिष्टमंडळसोबत बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, कर्नाटकात मराठी माणसावर जो अन्याय होत आहे तो लोकशाहीला शोभणारा नाही, तेथील सरकारकडून हे अपेक्षित नाही. या भागातील प्रश्न आणि अन्यायासंदर्भात लवकरच पंतप्रधानासमोर हे प्रश्न मांडू. वेळ आली तर न्यायालयात जाऊ, त्यासाठी राज्य सरकार आपल्या लढ्यास सर्वोतोपरी मदत करेल असे आश्वासन फडणवीस यांच्याकडून देण्यात आले.

दोन मंत्र्यांची नियुक्ती

महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील रहिवाशांवर होणार अन्याय, समस्यांसाठी राज्य शासनाकडून दोन मंत्र्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. जेणे करुन तेथील परिस्थितीवर लक्ष देता येईल. सीमावर्ती भागात बेळगाव, कारवार, निपाणी येथे बंद पडलेल्या शाळा पुन्हा सुरु करण्यासाठी महाराष्ट्र शासन निधी देईल असे देखील फडणवीस यांनी सांगितले.

मराठी शाळा जीवंत ठेवण्यासाठी

सीमावर्ती भाग महाराष्ट्रात आणण्यासाठी आणि या भागातील मराठी शाळा जीवंत करण्यासाठी हा लढा असल्याचे त्यांनी सांगितले. सीमावर्ती भागातील शाळा जीवंत राहाव्यात आणि तीचे संवर्धन व्हावे यासाठी फ्री टू एअर सेवेच्या माध्यमातून कार्यक्रमांचे प्रसारण करण्यासाठी महाराष्ट्र मदत करेल असे आश्वासन मुख्यमंत्र्याकडून सीमावासीयांच्या शिष्टमंडळाला देण्यात आले.

आरोग्यविषयक वृत्त

वजन कमी करण्यासाठी ‘हे’ खाऊ नका

मासिक पाळीच्या दरम्यान विचार पूर्वक निवडा वापरण्यात येणारी साधने

गरोदरपणात ‘हे’ ४ ब्युटी प्रॉडक्ट कधीही वापरू 

भाजलेल्या ठिकाणी चुकूनही लावू नका ‘या’ 

जाणून घ्या गुणकारी आवळ्याचे 

‘हाफकिन’मध्ये किफायतशीर औषधांची होणार 

‘ग्रीन टी’ प्रमाणात घ्या… नाहीतर उद्भवू शकतात ‘या’ 

मोडलेल्या हाडावर ‘गरम’ वस्तू टाकल्यास होईल नुकसान ; घ्या 

चॉकलेट वॅक्सचे ‘हे’ फायदे, जाणून 

पोटाची चरबी कमी न होण्याची ‘ही’ ९ मोठी कारणे, त्यासाठी ‘हे’ करा

 

You might also like