मुख्यमंत्री पदासाठी मी ‘सज्ज’, चंद्रकांत पाटलांना ‘त्या’ पदाचा आनंद घेऊद्यात की : CM देवेंद्र फडणवीस

नागपूर : पोलिसनामा ऑनलाईन – महाराष्ट्रात पुढील दोन महिन्यांत विधानसभा निवडणूक होणार आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपला जोर लावला असून विविध यात्रांच्या माध्यमातून भाजप आणि शिवसेना जनतेला आवाहन करण्याचे प्रयत्न करत आहेत. शिवसेनेच्या दोन यात्रानंतर आता भाजपने महाजनादेश यात्रा काढली असून महाराष्ट्रातील जवळपास १५० विधानसभा मतदारसंघातून हि यात्रा निघणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या यात्रेचे नेतृत्व करत असून काल नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांची हि यात्रा पोहोचली. यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका करत अनेक विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी त्यांना चंद्रकांत पाटील हेदेखील मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक असल्याचा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर ते म्हणाले कि, चंद्रकांत पाटील यांची काय इच्छा आहे याच्याशी मला काहीही देणेघेणे नाही, भाजपमध्ये निवडून आलेले आमदार आणि केंद्रातील वरिष्ठ नेते मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेत असतात. त्याचबरोबर चंद्रकांत पाटील आताच प्रदेशाध्यक्ष झाल्याने त्यांना या पदाचा आनंद घेऊद्यात. सध्या मुख्यमंत्रीपदासाठी मी सज्ज असल्याचे देखील फडणवीसांनी पत्रकारांना सुचवले.

काय म्हणाले होते पाटील

नुकतेच प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याने चंद्रकांत पाटील यांचे पक्षातील वजन वाढल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्यांना पत्रकारांनी मुख्यमंत्रीपदाविषयी प्रश्न विचारला असता ‘मला मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा नाही,’ असे पाटील म्हणाले होते. त्याचबरोबर पक्ष देईल ती जबाबदारी आपण स्वीकारत असतो असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांना विराम दिला.

आरोग्यविषयक वृत्त –