शरद पवार हे खोटं बोलत आहेत : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ईडीच्या कार्यालयात जाऊ नका यासाठी मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला असा दावा शरद पवारांनी जाहीर सभेत केला होता. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण देत हा दावा फेटाळला आहे. मी कधीही शरद पवारांना फोन केला नाही की तुम्ही ईडीच्या ऑफिसमध्ये जाऊ नका. ते खोटे बोलत आहेत, असे फडणवीस म्हणाले आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.

पवार यांनी केलेल्या दाव्याविषयी बोलताना फडणवीस म्हणाले की , ‘हे धादांत असत्य, खोटं आहे. शंभर टक्के खोटं आहे. मी कधीही पवारसाहेबांना फोन केला नाही की तुम्ही ईडीच्या ऑफिसमध्ये जाऊ नका. काही फोन मला आले, त्याबद्दल जर मी सांगितलं, तर राष्ट्रवादीच्या नेत्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही. पण मी राजकीय नीतीमत्ता पाळणाऱ्यांपैकी आहे. म्हणून त्याबद्दल मी सांगणार नाही, मी त्याबद्दल बोलणार नाही. ‘

या निवडणुकीनंतर विरोधी पक्षांना आणखी धक्के बसतील, तसेच त्यांना पराभव समोर दिसत आहे. यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला गेल्या निवडणुकीत मिळालेल्या जागांपैकी अर्ध्या जागाही मिळणार नाही. लोकांना विकास हवा आहेत. पवारसाहेबांनी किती फोडाफोडीचे कारण केले हे त्यांनी पाहावे. कालचक्र हे प्रत्येक गोष्टीचे उत्तर देते. लोक आता आमच्याकडे येत आहेत, ते त्याला फोडाफोडीचे राजकारण म्हणत आहेत, असेही फडणवीस म्हणाले.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी