मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वंचित बहुजन आघाडीबाबत ‘मोठं’ वक्‍तव्य, जाणून घ्या

नांदेड : पोलिसनामा ऑनलाईन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा हि नांदेडमध्ये असून यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. यावेळी विरोधी पक्षांवर टीका करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कि, भविष्यात वंचित बहुजन आघाडी हि राज्यात विरोधी पक्षनेता असेल. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी विरोधकांची किंमत जवळपास शून्य करून टाकल्याचे दिसून आले. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी नारायण राणे यांच्या पक्षप्रवेशावर देखील भाष्य केले.

नारायण राणे यांच्याविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले कि, राणे हे भाजपचेच खासदार असून ते भाजपमध्येच आहेत. मात्र त्यांच्या पक्षाविषयीचा निर्णय हा पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून घेतला जाईल, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांची हि यात्रा १ सप्टेंबरला सोलापूरमध्ये संपणार आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी मराठवाड्यातील दुष्काळावर चिंता व्यक्त करत पुन्हा विरोधकांवर टीका केली.

यावेळी मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावर बोलताना ते म्हणाले कि,मराठवाड्याला पाणी मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. यासाठी मोठा प्रकल्प सुरु करणार असून त्यांना हक्काचे 102 टीएमसी पाणी देणार आहोत. यासाठी कोकणातील 167 टीएमसी पाणी लिफ्ट करुन ते मराठवाड्यात आणणार आहोत. त्यामुळे मराठवाड्यातील दुष्काळ कमी होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

अशोक चव्हाणांवर टीका
यावेळी त्यांनी काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर देखील मोठ्या प्रमाणात टीका केली. यावेळी टीका करताना ते म्हणाले कि, अशोकाचं झाडं नूसतंच उंच उंच वाढतं मात्र,ते झाड कुणालाही सावली देत नाही.त्यामुळे त्यांचा लोकसभेत पराभव झाला, असा टोलादेखील लगावला.

You might also like