कॅप्टनच माघार घेतात मग तटकरे ‘किस झाड की मूली’ : मुख्यमंत्र्यांचा टोला

रायगड : पोलीसनामा ऑनलाईन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेनेचे रायगड मतदार संघातील उमेदवार आनंत गीते यांच्या प्रचारार्थ आज रायगड मध्ये उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि सुनील तटकरे यांच्यावर सडकून टीका केली. रायगडमध्ये सुनील तटकरेंनी भ्रष्टाचार केला, पैसा कमावला, कंपन्या उभारल्या असं काहीही अनंत गिते करू शकणार नाही अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.

यावेळी बोलताना सुनिल तटकरे यांच्यावरून पवारांवर टोला

यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यानी अप्रत्यक्षरीत्या पवारांवर टीका केली, ते म्हणाले ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभेच्या माढा मतदारसंघातून माघार घेतली. त्यामुळे जर कॅप्टनच मागे होत असेल तर तटकरे किस झाड की मूली है’ असं शब्दात मुख्यमंत्र्यांनी सुनील तटकरे यांच्यावर टीका केली.

रायगडात शिवसेना VS राष्ट्रवादी

रायगड लोकसभा मतदार संघात शिवसेनेकडून काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. अनंत गीते आणि सुनील तटकरे यांच्यात अटीतटीचा सामना झाला होता. शिवसेनेचे विद्यमान खासदार अनंत गीते यांनी २११० या अल्प मताधिक्याने निवडून आले होते. आता यंदा देखील रायगड लोकसभा मतदार संघात पुन्हा या दोघांमध्ये लढत होणार आहे.

शेकापची भूमिका महत्वाची

मागील निडणुकीत शेकापने स्वतंत्र उभ्या केलेल्या उमेदवारामुळे गीतेंना लोकसभेची वाट सोपी झाली होती; परंतु शेकापचा लालबावटा आता तटकरेंच्या बाजूने उभा राहिल्याने गीतेंसमोर आव्हान उभे राहिल्याचे चित्र आहे. रायगड लोकसभा मतदार संघामध्ये जातीच्या समीकरणाचा विचार केल्यास मराठा, कुणबी, आगरी, कोळी, माळी, दलित, मुस्लीम या समाज घटकांचा प्रामुख्याने प्रभाव आहे. या मतदार संघात जरी शिवसेनेचा खासदार असला तरी या मतदार संघामध्ये शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आल्याने त्यांचा चांगलाच दबदबा निर्माण झाला आहे.

सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. रायगड जिल्हा परिषदेवर शेकापसोबत ते सत्तेवर असल्याने त्यांचे लक्ष जिल्ह्यावर आहे. विकासकामे, भूमिपूजन बैठका अशा निमित्ताने ते जिल्ह्यात असतात. त्यांचे रायगड जिल्ह्यातील रोहे तालुक्यात घर असल्याने कार्यकर्ते पदाधिकारी यांना ते सहज भेटतात. त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचे जाळे विखुरलेले आहे. बहुजन वर्ग त्यांच्या पाठीशी आहे. त्याचप्रमाणे मुस्लीम, दलित अशी व्होट बँकही ते सांभाळून आहेत. शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीसोबत युती केली आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीत विरोधात असणारे शेकाप तटकरेंसोबत असल्याने कार्यकर्त्यांचा विश्वास दुणावल्याचे चित्र आहे.

सलग सहाव्यांदा खासदार म्हणून निवडून आलेले अनंत गीते केंद्रात अवजड उद्योग खात्याचे मंत्रिपद सांभाळत आहेत. त्यांची प्रतिमा चांगली आहे. दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी शिवसेनेत नाराज आहेत मात्र गीते आणि दळवींचे राजकीय संबंध चांगले आहेत. आता यंदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा २०१४ प्रमाणे निकाल येणार की सुनील तटकरे बाजी मरणार हे येणारा काळच ठरवेल.