इनकमिंग साठी दबावाची गरज नाही : देवेंद्र फडणवीस

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजपची वाट धरली आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. दबाव टाकून लोकांना पक्षात घेण्याची भारतीय जनता पक्षाला गरज नाही. तर शरद पवार यांनी त्यांच्या पक्षातील लोक का जात आहेत, यावर त्यांनी आणि त्यांच्या पक्षाने आत्मचिंतन करावे, असा पलटवार फडणवीसांनी केला आहे. ते नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

नेत्यांनी पक्षांतर करावे म्हणून ईडी सारख्या तपास यंत्रणांकडून त्यांच्यावर दबाव टाकला जात असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला होता. त्यावरही त्यांनी शरद पवार यांना प्रत्युत्तर दिले आहे. ज्या नेत्यांची ईडी चौकशी करत आहे, अशा लोकांना भारतीय जनता पक्षात कधीही घेतले जाणार नाही. जे चांगले आहेत, लोकांची कामे करतात अशांनाच पक्षात घेतले जाईल, असं त्यांनी सांगितलं. तसंच कुणाला दबाव टाकून पक्षात घेण्याइतका आमच्याकडे वेळ नाही, असंही त्यांनी सांगितलं. भाजपमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक आमदार येण्यास उत्सुक आहेत. भारतीय जनता पक्ष कुणाच्या मागे धावेल अशी पक्षाची स्थिती नाही. आमच्याकडे मोदी यांच्यासारखा मोठा नेता आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

हे सर्व सांगताना त्यांनी अजून एक गोष्ट नमुद केली. भाजप सरकारने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांची मदत केली आहे. अनेक साखर कारखानदारांना मदत केली आहे. त्यावेळी त्याबदल्यात पक्षात या असे कधीच म्हटलं नाही, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

आरोग्यविषयक वृत्त

 

Loading...
You might also like