विनोद तावडे, एकनाथ खडसेंच्या ‘पुनर्वसना’चे मुख्यमंत्र्यांकडून संकेत (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीसाठी विनोद तावडे आणि एकनाथ कडसे, चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपने उमेदवारी नाकराल्याने राजकीय वर्तुळातून आश्चर्य़ व्यक्त करण्यात येत आहे. आयारामांना तिकीट दिली, पक्षातील निष्ठावंतांना डावलले, त्यांची तिकीट कापली, त्यांचे चुकले काय यावरुन चर्चा रंगू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे तिकीट कापले हे म्हणणे चुकीचे आहे, त्यांची जबाबदारी बदलली असल्याचे सांगून त्यांचे पुनर्वसनाचे संकेत दिले आहेत.

खडसे, तावडे यांची तिकीटं कापली असे म्हणणे चुकीचे ठरेल. कारण पक्षामध्ये जबाबदाऱ्या बदलत असतात. त्यामुळे आता या नेत्यांचे तिकीट कापलं असे म्हणणे चुकीचे असून त्यांना नवी जबाबदारी दिली जाणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. आज झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये भाजप-शिवसेना-रासप-रिपाइं-शिवसंग्राम आणि रयत क्रांती या पक्षांच्या महायुतीची औपचारीक घोषणा करण्यात आली. त्यावळी त्यांनी युतीच फॉम्युला जाहीर केला.

लोकसभा निवडणुकीत युती केली होती. एखाद्या मुद्यावर, जागा वाटपावरून मतभेद असतील मात्र हिदुत्वाच्या मुद्यावर आम्ही एक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आमची युती होईल की नाही यामध्ये शंका होती. मात्र युती करण्यावर आम्ही ठाम होतो. दोन्ही पक्षांनी तडजोड केली, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच त्यांनी यावेळी निष्ठावंतांना डावलून आयारामांना उमेदवारी दिल्याचे खोडून काढत बाहेरच्या पक्षातून अनेकांना भाजप-शिवसेनेत यायचं होतं असेही सांगितले.