अमित शहांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीस दिसले ‘कॉन्फीडंट’, म्हणाले – ‘लवकरच राज्यात भाजपाचं नवीन सरकार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मतमोजणी होऊन खूप दिवस झाले असून देखील सत्ता स्थापनेला मुहुर्त भेटत नाही. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमधील तणाव वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर व महाराष्ट्रातल्या दुष्काळी परिस्थितीबद्दल चर्चा करण्यासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकांराशी संवाद साधला. दरम्यान, अमित शहांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीस कॉन्फीडंट दिसले आहेत.

 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘सत्तेच्या समीकरणाच्या संदर्भात कोण काय बोलते यावर मी काहीच बोलणार नाही. आज महाराष्ट्रात शेतकऱ्यांवर खूप मोठे संकट आहे आणि संकटाच्या काळात नवीन सरकार लवकरात लवकर स्थापन झाले पाहिजे आणि ते भविष्यात बनेल. महाराष्ट्राचे हित पाहता लवकरच नवीन सरकारची स्थापना होईल, अशी आम्हाला आशा आहे.’

ते पुढे म्हणाले की, ‘महाराष्ट्रात शेतकऱ्यांवर खूप मोठे संकट आहे. अवकाळी पावसाने राज्यात थैमान घालून अनेक शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. राज्यात ३२५ तालुक्यामध्ये शेतीचे खूप नुकसान झाले आहे. आज शेतकऱ्यांना मदतीची खूप गरज आहे. पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे किती नुकसान झाले याचे संपुर्ण डिटेल असेसमेंट मी शहा यांच्यासमोर ठेवले आहे. हे पाहता ते या गोष्टीचा नक्कीच विचार करुन महत्वाचे पाऊल उचलतील अशी आशा आहे. या संदर्भातील एक दुष्काळ पाहणी पथकही महाराष्ट्रात येईल. त्याचबरोबर अमित शहा यांनी अनेक सचिवांना माझ्यासमोर बैठकीदरम्यान यासंदर्भातील आदेश दिले आहे.’

Visit : Policenama.com