पुरग्रस्तांच्या एक हेक्टरवरील नुकसानीचे कर्ज माफ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन – कोल्हापूर – सांगली भागात नुकतेच अतिवृष्टीमुळे महापुराची साम्राज्य पसरले होते. पूर ओसरल्यावर शासनाच्या अनेक कामांना सुरवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. पूरग्रस्त भागातील एक हेक्टरवरील पिकांच्या झालेल्या नुकसानीचं कर्ज माफ करण्यात येणार आहे.

पुरामध्ये सर्वसामान्यांचे संसार पूर्णपणे उध्वस्त झाले होते. त्यात राहत्या घरांचेही मोठे नुकसान झाले होते. अशा नागरिकांनाही शासन मोठ्या प्रमाणावर मदत करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले, पूरग्रस्तांना घरं बांधून देण्यात येणार असून घरं बांधून होईपर्यंत ग्रामीण भागातील पूरग्रस्तांना भाडं म्हणून २४ हजार रुपये आणि शहरी भागातील पूरग्रस्तांना ३६ हजार रुपये भाडं देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे.

भविष्यात पुन्हा अश्या नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागू नये. यासाठी आणि नेमकं या पुराची कारणे काय होती, भविष्यात अशा आपत्तीच्या नियोजनासाठी काय करायला हवे. यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त –