…यासाठी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात वाटण्यात आल्या टोप्या

पंढरपूर : पोलीसनामा आॅनलाईन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भक्तनिवासाचे लोकार्पण करण्यासाठी पंढरपूर येथे एका कार्यक्रमात आले होते. दरम्यान या कार्यक्रमात वेगळीच चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले. कार्यक्रमासाठी आलेले मतदार वारकरी वाटावेत यासाठी मुख्यमंत्री येण्यापूर्वी सर्वच उपस्थितांना गांधी टोप्यांचे वाटप करण्यात आले. दरम्यान या कार्यक्रमातील या प्रसंगाबाबत चांगलीच चर्चा रंगली.

पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने उभारण्यात आलेल्या भक्तनिवासाचे लोकार्पणाचा कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.  हरित इमारतीचा दर्जा मिळालेल्या या भक्तनिवासात आधुनिक सुविधाही देण्यात आल्या आहेत. मुख्य म्हणजे  या कार्यक्रमाला मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी कराड येथून मोठ्या संख्येने मतदारांना आणले होते. कराड येथून आणलेले हे मतदार वारकरी वाटावेत यासाठी त्यांना टोप्या वाटण्यात आल्या. दरम्यान या कार्यक्रमानंतर  या टोप्यांचीच चर्चा रंगल्याचे चित्र पाहायला मिळाले. मतदार  वारकरी वाटावेत यासाठी मुख्यमंत्री येण्यापूर्वी सर्वच उपस्थितांना गांधी टोप्यांचे वाटप करण्यात आले.

डॉ. भोसले हे कराड येथील असून त्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात दक्षिण कराड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. डॉ. भोसले हे दक्षिण कराड विधानसभा मतदारसंघातून पराभूत झाले होते. त्यामुळे त्यांचे राजकीय पुर्नवसन करताना विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्षपद देण्यात आले. पुढे जाऊन त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जाही देण्यात आला. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या कार्यक्रमातच दक्षिण कराड विधानसभा मतदारसंघातून त्यांची उमेदवारी जाहीर केली. भोसले यांनी आता विधानसभेची तयारी करायची असून त्यांना माजी मुख्यमंत्र्यांना पराभूत करायचे आहे असे म्हटले.