जनतेकडून काँग्रेसची ‘पोलखोल’ !

अहमदनगर :पोलीसनामा ऑनलाइन – महाजानदेश यात्रेच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधात असलेल्या काँग्रेसवर चांगलीच तोफ डागली आहे. माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या निधनामुळे दोन दिवस स्थगित करावी लागलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला आज नगर जिल्ह्यातील पाथर्डी येथून पुन्हा सुरुवात झाली.

पाथर्डी इथे झालेल्या सभेत फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने काढलेल्या यात्रांचा खरपूस समाचार घेतला. तुमच्या 15 वर्षांच्या कारकिर्दीत केलेल्या चुकीच्या कामामुळे जनतेने त्रस्त होऊन तुम्हाला नाकारले आहे. तुम्ही काय करणार महापर्दाफाश, जनतेनेच तुमची पोल खोल केली आहे असा पलटवार मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवर केला. तसेच पुढील पंचवीस वर्षे तरी आता तुम्हाला जनता सत्ता देणार नाही. जनता आता मोदींच्या मागे खंबीरपणे उभी आहे असे मुख्यमंत्री यावेळी बोलताना म्हणाले.

काँग्रेने केले होते हे आरोप –
महापूराची परिस्थिती हाताळण्यात हे सरकार सपशेल अपयशी ठरलं आहे.
ज्या दिवशी ब्रह्मनाळमध्ये होडी उलटली त्यावेळी हे सरकार मजा करत होते.
हे सरकार घोषणा करण्यात पटाईत असून शेतकऱ्यांना अजुनही विमा मिळाला नाही.
2005-06 साली काँग्रेस सरकारने नियोजन केलं म्हणून पूर परिस्थिती नियंत्रणात होती

अशा प्रकारचे गंभीर आरोप सत्ताधारी भाजप सरकारवर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केले होते. काँग्रेसने सुरु केलेल्या पोल खोल यात्रेदरम्यान अमरावतीमध्ये झालेल्या सभेत ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र महाजनादेश यात्रा पुन्हा सुरु होताच काँग्रेसच्या सर्व आरोपांना चोख उत्तर दिले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –