४८ जागांसाठी आम्ही तयार, मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला इशारा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – भाजप आणि शिवसेना यांच्या युतीबाबत अद्याप संभ्रम असताना मुख्यमंत्र्यांनी ४८ जागा लढण्यास आम्ही तयार असल्याचे सांगत शिवसेनेला इशारा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्र आघाडीवर असेल. त्यासाठी पुणे जिल्ह्यातील लोकसभेच्या तिन्ही जागा जिंकायच्या आहेत असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे. ते पुण्यामध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पुन्हा काँग्रेसचा उमेदवार निवडून आल्यास मोठी चूक असले. मागीलवेळी भाजपचे ४२ खासदार निवडून आले. येत्या निवडणुकीत ४३ खासदार निवडून येतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. निवडून येणारा खासदार हा बारामतीतून असेल असेही त्यांनी सांगितले. काँग्रेस सरकारने कोणतीच कामे केली नाहीत. प्रत्येक कामात केवळ दिवस ढकलला मात्र, नरेंद्र मोदी यांनी एक दिवस ही गप्प न राहता काम करीत आहेत.

नरेंद्र मोदी यांनी २१ वे शतक देशाच्या नावाने केले आहे. या निवडणूकीत कार्यकर्त्यांनी बूथ पातळीवर काम केले पाहिजे ज्यामुळे निवडणुका जिंकणे सोपे होईल. त्यासाठी सरकारने केलेल्या कामाची माहिती लोकांपर्यंत पोचवा असे ही मुख्यमंत्र्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना सांगितले.शक्ती केंद्र् संमेलन आणि पक्ष कर्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी भाजपचे अध्यक्ष अमित शहा आज पुणे दौऱ्यावर आले आहेत. यावेळी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी पुणे, बारामती आणि शिरुर मतदार संघाचा आढावा घेतला.