मुख्यमंत्र्यांकडून खा. उदयनराजे, राणे आणि राज ठाकरेंबाबत ‘मोठं’ वक्तव्य

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फणवीस यांनी दिलेल्या एका मुलाखतीत एकाहून एक अनेक खुलासे केले. ते म्हणाले, मला पक्ष जेव्हा सांगेल तेव्हा माझी दिल्लीत जाण्याची तयारी आहे. मध्यंतरी, दिल्लीत नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र अशी घोषणा जाहिरातींमधून सगळीकडे दिसून येत होती.

मुख्यमंत्र्यांनी राज्यात आपला चांगलाच जम बसवला आहे. मुख्यमंत्री पदाची सलग पाच वर्ष पूर्ण करण्याऱ्या अतिशय कमी मंत्र्यांमध्ये फडणवीस यांचा समावेश झाला आहे. आम्ही सर्व घटक पक्षांना सामावून घेऊ असं सांगत त्यांनी घटक पक्षांना दिलासा दिला. मी खूप कमी काळ राज्यात आहे. पक्ष नेतृत्वाने आदेश दिल्यास मी दिल्लीवारीसाठी सज्ज आहे. असा त्यांनी मोठा खुलासा केला. त्यामुळे विविध चर्चा रंगत आहे.

राणे आमच्या सोबतच
मुख्यमंत्री म्हणाले, नारायण राणेंनी मला एका पुस्तक प्रकाशनाला बोलावले होते. पण त्यांनी सांगितलेल्या वेळेला मला जाणे जमले नाही. खासदार राणे आमच्या सोबतच असल्याचा मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला. काही दिवसांपूर्वी राणे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर राज्यात अनेक चर्चांना उधाण आले होते. आश्चर्य म्हणजे, आपला पक्ष विसर्जित करून भाजपमध्ये जातील कि काय असे अंदाज वर्तवले जात होते. असे जर झाले तर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे काय होणार याबाबत अनेक तर्क – वितर्क लढवले जात होते.

उदयनराजेंचे पक्षात स्वागतच असेल
फणवीस म्हणाले कि, आमच्या पक्षात उदयनराजे आले तर त्याचा आम्हाला आनंदच होईल आणि त्यांचे पक्षात स्वागतच असेल. सर्वसामान्य जनताच आमची परीक्षक आहे. आमच्या महाजानदेश यात्रेनंतर इतर राजकीय पक्षांना यात्रा काढावी वाटली तरीही विरोधकांच्या यात्रांना लोकांचा पाठिंबा नाहीये. महाजनादेश यात्रे बद्दल लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. आम्ही अपेक्षा पूर्ण करु याचा लोकांना विश्वास वाटतो.

पूरग्रस्त भागातील जनतेचा मिळेल पाठिंबा
अस्मानी शकत कोसळलेल्या कोल्हापूर, सातारा, सांगली या शहरांमधील पूरग्रस्त जनता नक्कीच आम्हाला पाठिंबा देईल. असा आम्हाला विश्वास आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी पूरग्रस्त भागाबद्दल चर्चा विनिमय केला आहे. महापूराचा येत्या विधानसभा निवडणूक निकालावर परिणाम होणार नाही असंही त्यांनी सांगितलं. तसेच ते म्हणाले, पूरग्रस्त भागासाठी मोठा निधी देण्यात आला आहे. पूरग्रस्त भागात रंगत असलेल्या अनेक चर्चा उथळ आहेत.

अजित पवार, यांच्या बाबतच्या प्रकरणात अनेक दिवसांपासून चौकशी सुरु आहे.  सहकार नाही तर स्वाहाकार झालाय. कोर्टाच्या निकालानुसार आम्ही योग्य ती कारवाई करू असं फडणवीस म्हणाले.

राज ठाकरे आता हारल्यात जमा
महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांची ईडी ने केलेली चौकशी राजकीयदृष्ट्या अजिबात नाही. राज ठाकरे सगळीकडे हरलेत. जे स्वतःच राजकीयदृष्या हरल्यात जमा आहेत त्यांची अशी मुद्दाम चौकशी करुन काय फायदा…? लोकसभा निवडणुकीच्या वेळेस राज ठाकरे यांच्या भाषणानं कोणताही विशेष असा परिणाम झाला नाही तो आता काय होणार…? राज ठाकरेंनी जिथे-जिथे सभा घेतल्या तिथे-तिथे काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूतच झाले होते.

पुढे मुख्यमंत्री म्हणाले, राज ठाकरे यांच्याबद्दल उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलेलं मत त्यांचं ते वैयक्तिक मत आहे. माझी आणि शरद पवार यांची काम करण्याची एक वेगळी पद्धत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –