मी काही काळच राज्यात, दिल्लीत जाण्यास तयार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दिल्लीत नरेंद्र तर राज्यात देवेंद्र अशी घोषणा राज्यात नेहमी दिली जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यामध्ये आपले स्थान भक्कम केले आहे. सलग पाच वर्षे कार्यकाळ पूर्ण करायला मोजक्याच मुख्यमंत्र्यांना मिळाले आहे. त्यापैकी एक देवेंद्र फडणवीस. मुख्यमंत्री सध्या महाजनादेश यात्रेवर निघाले असून या यात्रेदरम्यान त्यांनी एक गुगली टाकली आहे. त्यांच्या या गुगलीमळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

महाजनादेश यात्रेवर निघालेल्या मुख्यमंत्र्यांनी एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत ही गुगली टाकून सर्वांना धक्का दिला आहे. मी काही काळच राज्यात आहे, मला पक्ष जेव्हा सांगेल तेव्हा माझी दिल्लीत जाण्याची तयारी आहे असे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

नारायण राणेंच्या भूमिकेबाबत मोठा खुलासा
नारायण राणे यांनी काही दिवसापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यांच्या भेटीमुळे नव्या राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे. राणे भाजपात येणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राणे यांच्या भाजपा प्रवेशावर पूर्ण विराम देताना राणे हे आपल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी आले असल्याचे सांगितले. तसेच राणे आमच्यासोबत असून राणेंनी राज्यसभेत जाण्याचा निर्णय त्यांच्याशी चर्चाकरून घेतला असल्याचे स्पष्ट करून त्यांनी आपला आपला पक्ष भाजपामध्ये विलीन करायचा आहे असा खुलासा त्यांनी यावेळी केला.

आरोग्यविषयक वृत्त –

 

You might also like