जय महाराष्ट्र ! विधानसभा निवडणूकीनंतर आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्रिपद

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणूक जवळ आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आता राजकीय घडामोडींना मोठ्या प्रमाणावर जोर आला आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्षांच्या चर्चा-बैठकांना सुरुवात झाली असून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जात आहेत. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच यर्त्या विधानसभा निवडणुकीमध्येही शिवसेना आणि भाजपा युती करून एकत्रच लढणार आहेत. त्याचेच आदित्य ठाकरे सक्रिय राजकारणात उतरत असून त्यांच्या मंत्रिपदाबद्दलही बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, ‘युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यास तयार असून त्यांना सरकारचा भाग म्हणून पहायला आवडेल’. असे महत्त्वपूर्ण वक्तव्य आज केले.

भाजप-शिवसेना सामान जागांवरच लढणार :

टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यासंदर्भात वक्तव्य केले. यावेळी त्यांनी ठाकरे परिवारातील आदित्य ठाकरे हे निवडणूक लढवणारे पहिलेच सदस्य ठरणार असून त्यांना सरकारमध्ये पाहायला आवडेल असे ते म्हटले. त्याचबरोबर सेना भाजपा कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणुकांमध्ये एकत्र लढणार आहेत. शिवेसना आणि भाजपा राज्यात समान जागांवर निवडणूक लढवणार आहेत. प्रत्येकी १३० ते १४० जागांवर आम्ही लढणार असून उर्वरित जागा आमच्या मित्रपक्षांसाठी सोडण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. २०१४ साली झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपाने १४४ जागा लढवून त्यांपैकी १२२ जागांवर विजय मिळाला होता.

पक्षप्रवेशांना ‘महाभरती’ असं म्हणणार नाही :

या मुलाखतीत त्यांनी अन्य पक्षातून भाजपमध्ये होणाऱ्या पक्षप्रवेशांना ‘महाभरती’ असं म्हणणार नसल्याचं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं. आता आम्ही हाऊसफुलचा बोर्ड लावला आहे. त्याचबरोबर येत्या काही दिवसांमध्ये अनेक मोठे नेते भाजपात प्रवेश करतील, असे खळबळजनक दावाही त्यांनी यावेळी केला. अति महत्त्वाच्या व्यक्तींना अपवादात्मक परिस्थितीत पक्षप्रवेश देणार असून त्यांची पार्श्वभूमी, त्यांचं काम आणि लोकप्रियता पाहून भाजपामध्ये प्रवेश देऊ शकतो. तसेच येणाऱ्या विधानसभा केवळ विकासाच्याच मुद्द्यावर लढवणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.

या मुलाखतीत राज्यात सुरू असलेल्या विकासप्रकल्पांवरही मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली. बुलेट ट्रेन आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक हे दोन्ही महत्त्वाचे प्रकल्प असून बुलेट ट्रेनमुळे अर्थव्यवस्थेला वेग येणार असून मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांचीही उपलब्धता होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त