EVMच्या मुद्द्यावर विरोधकांनी एकजूट केली तरी, काही फरक पडणार नाही : CM देवेंद्र फडणवीस

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर भाजपने महाजनादेश यात्रेला सुरुवात केली. आज यात्रेचा दुसरा दिवस असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यात्रेनिमित्त वर्ध्यात आहेत. यात्रेपूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. विरोधकांनी उचलून धरलेला ईव्हीएमचा मुद्दा पकडत मुख्यमंत्र्यांनी त्यांना टोमणे मारले आहेत. ईव्हीएमच्या मुद्द्यावर विरोधकांनी एकजूट केली तरी, काही फरक पडणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं. तसच विरोधकांनी ईव्हीएमविरोधात आंदोलन करण्याऐवजी जनतेत जावं. आम्ही कामं करू शकलो नाही. भविष्यात ती पूर्ण करू असं सांगितलं तरी, जनतेकडून तुम्हाला किमान सहानुभूती मिळेल, असा चिमटा त्यांनी यावेळी काढला.

परिषदेत त्यांनी विरोधकांवर निशाना साधला. ईव्हीएमवर अविश्वास दाखवणं म्हणजे जनतेवर अविश्वास दाखवण्यासारखं आहे. या मुद्यावर विरोधकांची एकजूट होऊन काही फरक पडणार नाही. ईव्हीएमविरोधात आंदोलन करण्याऐवजी त्यांनी जनतेत जावं. आम्हाला कामं करता आली नाहीत, भविष्यात ती करू असं सांगितलं तरी जनतेकडून तुम्हाला सहानुभूती मिळेल, असा टोलाही त्यांनी लगावला. तसंच काँग्रेस-राष्ट्रवादी सोडून जाणाऱ्या नेत्यावरूनही त्यांनी विरोधकांची खिल्ली उडवली. आपल्या कार्यकर्त्यांनी पक्षांतर करू नये म्हणून काही पक्ष त्यांना शपथा घालत आहेत. मात्र या शपथांनी तरी हे थांबणार आहेत का ?, असा मिश्किल सवालही त्यांनी यावेळी केला.

विरोधकांवर टीका करताना त्यानी जनतेच्या प्रश्नांनाही हात घातला. महाजनादेश यात्रेचा उद्देशही त्यांनी सांगितला. सध्या महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून गेल्या ५ वर्षांत केलेली कामे जनतेला सांगणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसंच राज्य दुष्काळमुक्त करणे हे आमचे यापुढील ध्येय असेल, असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, पक्षात येणाऱ्या राष्ट्रावादी काँग्रेसच्या नेत्यांमुळे विधानसभांच्या जागावाटपाबाबत भाजप-सेनेच्या जागा वाटपात अडचणी येऊ शकतात. त्यावरूनही त्यांनी स्पष्टीकरण देत विधानसभेत भाजप-सेना युतीच जिंकेल असा विश्वास व्यक्त केला. जागावाटपात अडचणी निश्चित आहेत. दोघांचेही नुकसान होईल. पण एकत्र येऊन लढायचे ठरवले की, काही गोष्टी सोडाव्या लागतात, असं सुचक व्यक्तव्यही त्यांनी यावेळी केले.

आरोग्यविषयक वृत्त –