माझ्यावर टीकेची करुन ‘कामना’, विखे पाटीलसाहेब वाचतात ‘सामना’

पोलीसनामा ऑनलाईन : यंदाचे हिवाळी अधिवेशन वादळी व ऐतिहासिक ठरले अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयकाला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजुरी देण्यात आली. या अधिवेशनात विधानसभेत ११ तर दोन्ही सभागृहात १४ विधेयक संमत झाले या संपूर्ण अधिवेशनात विरोधकांनी मराठा आरक्षण, दुष्काळाच्या मुद्यावरुन सरकारला धारेवर धरले.

विशेष म्हणजे या अधिवेशनाच्या  शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणादरम्यान एक कविता सादर केली . कवितेतून त्यांनी आगामी निवडणुकीसाठी भाजपा-शिवसेना युतीचा दाखलाही दिला. आणि तसेच त्यांनी शिवसेनेसह विरोधकांवर निशाणा साधला व कवितेतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघर्ष यात्रेवर सुद्धा टीका केली. मुख्यमंत्र्यांच्या या कवितेला सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही दाद दिली.

मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सादर केलेली कविता अशी …

माझ्यावर टीकेची करुन ‘कामना’, विखे पाटीलसाहेब वाचतात ‘सामना’

संघर्ष यात्रेला लाभत नाही गर्दी, म्हणून त्यांच्या घरी वर्तमानपत्रांची वर्दी
जनता जनार्दन आहे आमच्या बाजूला, म्हणून तुमची खुर्ची असेल त्याच बाजूला
२०१९ चा संग्राम आला जवळ, बाजी मारणार सेनेचा बाण आणि भाजपचे कमळ