शिवसेनेची धास्ती असल्यानं ‘त्या’ आत्मचरित्रावरून CM फडणवीस यांच्यासमोर ‘पेच’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करणाऱ्या मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना स्वाभिमान पक्षाचे सर्वेसर्वा नारायण राणे यांचा सोईस्कर ‘विसर’ पडत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यातही राणे यांच्या ‘नो होल्ड्स बार्ड’ या आत्मचरित्राचे प्रकाशन कसे करायचे याचा पेचही मुख्यमंत्र्यांसमोर निर्माण झाला आहे. शिवसेनेला गोंजारण्याच्या नादात राणेंची नाराजी ओढवली जात असली तरी राणेंची अवस्थाही ‘सांगता येत नाही आणि सहनही होत नाही’ अशी झाली आहे.

स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष खासदार नारायण राणे यांच्या ‘नो होल्ड्स बार्ड’ या आत्मचरित्रात अनेक गौप्यस्फोट करण्यात आल्याचा दावा राणे यांच्या कुटुंबीयांकडून केला जात आहे. मध्यंतरी या पुस्तकाचा काही भाग माध्यमांच्या हाती लागला होता. यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा संदर्भ होता. ‘जर नारायण राणे पक्षात राहिले तर मी आणि रश्मी ठाकरे घर सोडून जाऊ, अशी उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंना धमकी दिल्याचा गौप्यस्फोट या पुस्तकात करण्यात आला आहे. तसेच शिवसेनेच्या इतर नेत्यांबाबत ही यात अनेक गौप्यस्फोट करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे मुख्यमंत्री पद मला मिळाल्याने त्यांचा माझ्यावर राग होता. त्यामुळेच जोशी यांनी उद्धव ठाकरे यांचे माझ्या विरोधात कान भरले, असाही उल्लेख या पुस्तकात करण्यात आला आहे. आता या आत्मचरित्राचे प्रकाशन करण्यास मुख्यमंत्री वेळ देत नसल्याने राणे हतबल झाले आहेत. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीआधी या आत्मचरित्राचे प्रकाशन करावे अशी राणेंची इच्छा आहे. नारायण राणे शिवसेना सोडल्यावर १० वर्ष काँग्रेसमध्ये होते. काँग्रेसच्या नेत्यांविषयी ही या पुस्तकात उल्लेख करण्यात आला आहे. मात्र एकूणच राणे यांचे आत्मचरित्र शिवसेना आणि शिवसेनेच्या शीर्ष नेत्यांभोवती फिरत असल्याचे स्पष्ट होत आहे.

त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची वेळही मागितली आहे; पण विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऐनवेळी शिवसेनेला नाराज करून चालणार नसल्याने तूर्तास राणेंच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनाला ‘मुहूर्त’ मिळत नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता नारायण राणे कोणता पवित्रा घेतात आणि आत्मचरित्र कुणाच्या हस्ते प्रकाशित करतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

आरोग्यविषयक वृत्त

‘या’ पेयाचे नियमित सेवन करा आणि उत्तम आरोग्य मिळवा

सावधान ! ‘कॅन्सर’ला धुम्रपानापेक्षा लठ्ठपणा अधिक कारणीभूत

‘किडनी स्टोन’ वर घरगुती रामबाण उपाय

‘हे’ आहेत दही खाण्याचे फायदे

घरी तयार केलेले लोणी चवीसह देते आरोग्य !

‘या’ १३ आरोग्य समस्यांवर आहेत ‘हे’ रामबाण उपाय

पावसाळ्यात काजळाने होते इन्फेक्शन ! अशी घ्या काळजी

केसगळतीच्या समस्येवर ‘हे’ घरगुती उपाय ठरतील वरदान

दररोज ४ काजू, ८ मनुका सेवन करा, झटपट बरे होतील ‘हे’ आजार