‘हेल्मेट’ सक्‍तीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया, घ्या जाणून

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातील ८ भाजप आमदारांनी भेटून हेल्मेटसक्तीबाबत आपली कैफियत मांडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पुणे पोलीस आयुक्तांना सीसीटिव्हीच्या माध्यमातून मुंबई आणि नागपूर प्रमाणे कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. आमचा हेल्मेट सक्तीला विरोध नाही. परंतु नागरिकांच्या जीवाच्या सुरक्षिततेसाठी केली जाणाऱ्या हेल्मेट सक्तीच्या कारवाईचा त्यांना त्रास होऊ नये असे मुख्यमंत्री म्हणाले.

हेल्मेट सक्तीला आमचा विरोध नाही. फक्त ज्याप्रकारे नागरिकांना त्रास दिला जातोय. पाच पाच पोलीस रस्त्यात उभे राहतात. नागरिकांना अडवतात. त्यामुळे रांगा लागतात. त्याचा नागरिकांना त्रास होतो. त्यामुळे मी पोलीस आयुक्तांना निर्देश दिले की, ज्याप्रमाणे मुंबई आणि नागपूरमध्ये हेल्मेट न घालणाऱ्यांवर कारवाई केली जाते त्याप्रमाणे पुण्यातही सीसीटिव्हीच्या माध्यमातून कारवाई करा. नागरिकांना त्यांच्या घरी किंवा ऑफिसमध्ये चलन पाठवा. म्हणजे ते आपोआपच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार नाहीत. असे ते म्हणाले.

पुण्यातील ८ आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून नागरिकांमध्ये पुण्यात सुरु असलेल्या हेल्मेट सक्तीच्या कारवाईबाबत नागरिकांच्या मनात असंतोष असल्याची भावना व्यक्त केली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांना फोन वरून सुचना दिल्या.

पुणे पोलिसांनी पुणेकरांभोवती हेल्मेट सक्तीचा फास आवळल्यानंतर नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. त्यानंतर संघटनाही पुण्यात आक्रमक झाल्या होत्या. पुणेकरांनी पुण्यातील आमदारांना भेटून आपली कैफीयत मांडली होती. सध्या चौकाचौकात पोलीस नागरिकांना अडवून हेल्मेट सक्तीबाबत कारवाई करत आहेत. त्यामुळे पुण्यातील नागरिक त्रस्त झाले होते. त्यावर आमदारांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हेल्मेट सक्तीची कारवाई न करण्याची मागणी केली होती.

सिनेजगत

#Video : १५ वर्षाच्या मुलाचा ‘संघर्ष’ सांगणाऱ्या ‘NOBELMEN’चा ट्रेलर ‘रिलीज’

अभिनेत्री कंगनासोबतच्या ‘किसिंग’ सीनला शाहिद कपूर म्हणाला ‘चिखल’, जाणून घ्या कारण

आरोग्यविषयक वृत्त (www.arogyanama.com)

रात्री २ विलायची खाऊन १ ग्लास गरम पाणी प्या ; होईल ‘ही’ कमाल

हळदीचे ‘हे’ दोन फेसपॅक वापरून तुम्ही दिसाल तजेलदार

एक कप ग्रीन टी नियमित घेतल्यावर होतील ‘हे’ चमत्कारिक फायदे

केस का गळतात? कारणे जाणून करा सोपे घरगुती उपाय

कामसूत्र फॉलो करा, संभोगसुखाचा मिळेल पूर्ण आनंद