home page top 1

CM फडणवीस ‘या’ तारखेला विधानसभेचे ‘रणशिंग’ फुंकणार !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक २१ जुलै रोजी पार पडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही बैठक मुंबईतील गोरेगाव येथे असलेल्या नेस्को संकुलात होणार आहे.

राज्यात लवकरच विधानसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर ही राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडणार असून या बैठकीत राज्यभरातील भाजपाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच या बैठकीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर आता सर्वच पक्षांच्या बैठकांना वेग आला आहे.

काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी राज्यात २२0 पेक्षा अधिक जागा जिंकणार असल्याचा विश्‍वास व्यक्त केला होता. लोकसभा निवडणुकीत राज्यात शिवसेना भाजपने एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. आम्ही आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र प्रचार करत राज्यातील ४८ पैकी ४१ जागांवर विजय मिळवला. आता आगामी विधानसभा निवडणुकीतही शिवसेना आणि भाजप एकत्र निवडणूक लढवणार असून २२0 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवू, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केला होता. विधानसभा निवडणुकीत युतीला २२0 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळाल्यास आश्‍चर्य वाटू नये, असेही त्यांनी नमूद केले होते.

आरोग्यविषयक वृत्त –

डोकेदुखीने त्रस्त आहात का ? हे घरगुती रामबाण उपाय करा

अपचनाची समस्या अशी दूर करा, हे आहेत प्रभावी ६ घरगुती उपाय

पावसाळ्यात आलू बुखार आवश्य खा, यात आहेत भरपूर ‘व्हिटामिन्स’

दात पांढरेशुभ्र हवे असतील तर लिंबाचा असा करा उपयोग

वॅक्स करताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी !

‘या’ कारणामुळे फुटतो घोळाणा ; घ्या जाणून

‘नागीण’ या आजारावर ‘हे’ घरगुती उपाय !

‘या’ ५ कारणांमुळे होते ‘किडनी’ खराब, जाणून घ्या

‘मक्याचं’ कणीस खाल्यावर लगेच पाणी पिणे पडेल ‘महागात’

Loading...
You might also like