‘गोरक्षणाचं काम व्यवस्थित न केल्यानं सत्ता स्थापनेत अडचणी’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्र्यांनी 5 वर्ष गोरक्षेचं काम व्यवस्थित न केल्याने सत्ता स्थापन करण्यात अडचणी येत आहेत. राजकारण्यांनी गोमातेचे रक्षण केले तर राजकारण व्यवस्थित चालेल असं वक्तव्य हिंदुत्ववादी कार्यकर्ते मिलिंद एकबोटे यांनी केलं आहे. समस्त हिंदुत्ववादी संघटनांकडून पुण्यात झाशीची राणी चौकात रावसाहेब दानवे यांच्या गोहत्येसंदर्भातील वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आलं. यावेळी एकबोटे बोलत होते.

झाशीची राणी चौकात केलेल्या या आंदोलनात रावसाहेब दानवे यांच्या प्रतिमेला चपलांचा हार घालण्यात  आला. यावेळी अनेक फलक लावलेले दिसले. गोहत्येचं समर्थन करणाऱ्या रावसाहेब दानवेंचा धिक्कार असो, गली गली में शोर है, रावसाहेब मियाँ कसाई चोर है, अशा अनेक फलकांचा यात समावेश होता. जालना येथील एका मेळाव्यात दानवे यांनी गोहत्येचं समर्थन करणारं वक्तव्य केलं होतं.

एकबोटे म्हणाले की, “ज्यांना गोमातेचा मान कळत नाही, ज्यांना धर्माशी देणंघेणं नाही त्यांनी राजकारण करण्याची गरज नाही. गोरक्षक त्यांच्यावर बहिष्कार टाकतील. मॉब लिंचिंगचा आरोप गोरक्षकांवर केला जातो. ही एकतर्फी लबाडी आहे. ही कसायाची उलटी बोंब आहे. गोरक्षण करताना कसायांनी पाच वेळा माझ्यावर हल्ला केला आहे. परंतु कसायांनी केलेल्या मॉब लिंचिंगवर बोललं जात नाही.”

गायीबद्दल बोलताना एकबोटे म्हणाले, “गोमुत्रामुळे कॅन्सर बरा होतो. दुधामुळे लहान मुलांची हाडे मजबूत होतात. शेणामुळे त्वचारोग बरे होतात. गाईच्या शेणाचा साबण वापरल्यास आपली त्वचा निरोगी राहते. व्यक्तिमत्व तेजस्वी दिसते. गाई अध्यात्म आणि विज्ञान यांचा संगम आहे. जगात गाईसारखा दुसरा प्राणी नाही. 84 लाख प्राण्यांमध्ये गाईकडे एवढी वैशिष्ट्ये आहेत. असे असतानाही सरकारला आजपर्यंत संपूर्ण देशात गोहत्याबंदी लागू करता आली नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे.”

Visit : Policenama.com

तुमच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे सुद्धा होऊ शकतो ‘मायग्रेन’ चा त्रास
भेसळयुक्त ‘कुंकू’ वापरले तर होऊ शकतात ‘गंभीर’ परिणाम, जाणून घ्या
शरीरयष्टी किरकोळ असेल तर ‘हे’ 6 पदार्थ खा, दिसाल सेलिब्रिटींसारखे फिट
चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी करा ‘हे’ 5 घरगुती आणि सोपे उपाय, जाणून घ्या
चुकीनही करू नका ‘यो यो डाएट’, बिघडू शकते तब्येत, जाणून घ्या
‘जंक फूड’ खाण्याची सवय सोडविण्यासाठी ‘हे’ 5 खास उपाय, जाणून घ्या
सावधान ! प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय ? जाणून घ्या धोके