मुख्यमंत्र्यांना राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य नाही : शरद पवार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन

मुख्यमंत्र्यांना राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य नाही, त्यांना दुष्काळी परिस्थिती कशी हाताळावी याचीही माहिती नाही, रोहयोचीही माहिती नाही, नगरसह राज्यातील अनेक जिल्ह्यात दुष्काळामुळे दोन महिन्यानंतर भयावह परिस्थिती निर्माण होणार आहे. राज्याच्या प्रमुखालाच परिस्थितीचे गांभीर्य नसल्याने सर्वसामान्यांना परिणाम भोगावे लागणार आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’91ae23fe-c5f8-11e8-b345-d3770f5ce7cb’]

नगरमधील राष्ट्रवादी भवनमध्ये आयोजित पक्षकार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मधुकर पिचड, दिलीप वळसे, संग्राम जगताप, अरुण जगताप, वैभव पिचड, राहुल जगताप, संग्राम कोते, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके आदी उपस्थित होते. यावेळी शरद पवार म्हणाले, राज्य सरकार दुष्काळी परिस्थिती व शेतकऱ्यांचा वाढता कर्जबाजारीपणा याकडे लक्ष देत नसल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरुद्ध संघर्ष करावा.

कर्जबाजारी आयएलएफएसवरून काँग्रेस व भाजपमध्ये पुन्हा जुंपली

लोकसभा निवडणुका नेमक्या कधी होतील याचा सध्या अंदाज नाही, परंतु फेब्रुवारीनंतर कधीही होण्याची शक्यता आहे, त्यामुळे तयारीसाठी केवळ ३ महिन्यांचा कालावधी बाकी आहे, त्यामुळे आपल्यावर अधिक जबाबदारी आहे, लोकांमध्ये सरकारविरुद्ध अस्वस्थता आहे, लोक सरकारविरुद्ध एकत्र येण्यास तयार आहेत, ८१ हजार कोटींची कर्जमाफी दिल्याचे सरकार सांगते मात्र ती कोणाला मिळाली हे सांगता येत नाही, हा पैसा काही बँकाच्या माध्यमातून उद्योगांचे थकित कर्ज माफ करण्यासाठी वापरला गेला. अनेक राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना किंमत देत नाहीत, त्यांना दारात उभे करत नाहीत, पंतप्रधान केवळ मन की बात करतात, परंतु त्यांना जन की बात माहिती नाही, भाजपला आता लोक कंटाळले आहेत, यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरुद्ध संघर्ष करत प्रश्न सोडवावे व जागृती घडवावी, असेही आवाहन त्यांनी केले.

[amazon_link asins=’0140259848′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b59e466b-c5f8-11e8-a75e-31979e21eab1′]

नगर जिल्हा कधीच भाजपचा म्हणून ओळखला जात नव्हता, हा जिल्हा पूर्वी प्रागतिक व डाव्या विचारांचा म्हणून ओळखला जायचा, नंतर काँग्रेस व आपला होता, परंतु जिल्ह्याचे हे चित्र आता बदलले आहे, भाजपला ५ जागा मिळाल्या. याचा अर्थ भाजपचा विचार लोकांनी स्वीकारला आहे, असे नाही तर जिल्ह्य़ात काँग्रेस व राष्ट्रवादी एक विचारांनी राहिली नाही, जिल्ह्यात भाजप लोकांपर्यंत पोहचलेला नाही तर आपणच कमी पडलो आहोत, असे पवार म्हणाले.