×
Homeताज्या बातम्याCM Eknath Shinde | राज्यात 75  हजार पदांची भरती करणार, मुख्यमंत्री एकनाथ...

CM Eknath Shinde | राज्यात 75  हजार पदांची भरती करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील 75 हजार रिक्त पदांची भरती केली जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी गुरुवारी (दि.25) विधानसभेत सांगितले. महाराष्ट्र विधानसभा (Maharashtra Legislative Assembly) नियम 292 अन्वये उपस्थित करण्यात आलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) बोलत होते.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले, राज्यातील विविध विभागांच्या आस्थापनेवरील रिक्त पदांचा आढावा घेतला जात आहे. या सर्व रिक्त जागा भरण्यासाठी 75 हजार रिक्त पदांची भरती (Recruitment of Vacancies) केली जाणार आहे. या पदसंख्येत आणखी काही हजारांत वाढ होण्याची शक्यता आहे.

 

आरे येथेच मेट्रो कारशेड होणार
मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या (Metro Rail Project) कारशेड आरे (Aarey Car Shed) येथेच उभारले जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ते म्हणाले, आरे येथे वनजमिनींची एकूण 1285 हेक्टर जमीन आहे. त्यामध्ये आणखी 326 हेक्टर जमीन वन क्षेत्रात समावेश केला आहे. कारशेडसाठी केवळ 25 हेक्टर जमीन लागणार आहे. या जागेच्या तीनही बाजूंनी रहदारीचे रस्ते आहेत. त्यामुळे आरेमधील जागा कारशेडसाठी योग्य आहे. याबाबत मदान समिती (Madan Samiti) आणि सौनिक समितीनेही (Sainik Samiti) आरे येथील जागाच कारशेड साठी उपयुक्त असल्याची शिफारस केली आहे.

 

राज्यातील गुन्हेगारीत घट
राज्यातील गुन्हेगारीत (Crime) घट झाली असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ते म्हणाले, राज्यातील गुन्हेगारीत घट झाली असल्याचे स्पष्ट होत आहे. त्याचबरोबर गुन्हे प्रकटीकरणात वाढ होत आहे. पोलिसांनी (Maharashtra Police) मुस्कान अभियानामधून राज्यातील सुमारे 37 हजार 511 मुले आणि मुलींचा शोध घेऊन पालकांकडे सुपूर्द केली आहेत. अंमली पदार्थांच्या विरोधात पोलीसांनी कठोर कारवाई केली आहे, असे त्यांनी सांगितले.

पोलिसांना पंधरा लाखात घर
बीडीडी चाळीचा पुनर्विकास (BDD Chali Redevelopment) गतीने पूर्ण केला जाईल. या पुनर्विकास इमारतींमध्ये पोलीसांना केवळ पंधरा लाख रुपयांत घर उपलब्ध करून दिले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. पोलीसांना अधिक घरे उपलब्ध व्हावीत यासाठी गृहनिर्माण धोरणात विशेष तरतूद केली जाईल. पोलीसांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे. न्यायालयीन विकासासाठी दरवर्षी भरीव निधी देण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

 

मुंबईतील मालमत्ता करात वाढ नाही
कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मालमत्ता करात वाढ करण्यात आली नव्हती. आणखी एक वर्ष मालमत्ता करात वाढ केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. उल्हासनगर मधील एक जानेवारी 2005 पूर्वीच्या अनधिकृत बांधकामांना नियमित करण्यासाठी विशेष कार्यप्रणाली राबविण्यात येईल. त्यासाठी प्रशमन शुल्कातही मोठ्या प्रमाणावर कपात करण्यात आली आहे. हे शुल्क प्रति चौरस मीटरास 2200 रुपये आकारले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

 

शेतकऱ्यांना भरीव मदत
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या (NDRF) निकषापेक्षा जास्त मदत तत्काळ दिली आहे. पूर्वी ही मदत केवळ पाच हजार रुपये होती. ती मदत आता पंधरा हजार रुपये दिली जात आहे. गावांचे शहराशी दळणवळण वाढायला मदत व्हावी यासाठी रस्ते विकासासाठी प्राधान्याने काम केले जाणार आहे.

 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील मुद्दे

पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात केली (Reduction in Petrol-Diesel Prices)

चौदा लाख शेतकऱ्यांना आर्थिक मदत

उपसा जलसिंचन योजनेच्या (Upsa Irrigation Scheme) वीजदरात एक रुपयांनी कपात

राज्यातील गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक प्रयत्न

हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) समृध्दी महामार्गचे (Samruddhi Mahamarg) लवकरच लोकार्पण

सत्तावीस हजार कोटी रुपयांचे विकास प्रकल्प हाती

एमएमआरडीएच्या (MMRDA) साठ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांना शासन हमी

मुंबई-गोवा महामार्गाचा (Mumbai-Goa Highway) सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यास सुरुवात

प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय (Medical College) सुरू करणार

वसई विरार मल्टीमोडल हबचा सविस्तर प्रकल्प अहवाल

पुणे रिंग रोड (Pune Ring Road) आणि रेवस-रेड्डी रस्त्यास निधी उपलब्ध करणार

पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा सर्वंकष विकास आराखडा

मंदिरे आणि गड किल्ले यांचे जतन-संवर्धन करणार

कोल्हापूर सांगली शहरातील पुराबाबत सल्ला घेऊन उपाययोजना करणार.

 

Web Title :- CM Eknath Shinde | 75 thousand posts will be recruited in the state, informed by Chief Minister Eknath Shinde

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Zilla Parishad | जिल्हा परिषदेत सेवा हमी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी खास मोहीम

 

CM Eknath Shinde | ‘पहाटेच्या शपथविधीला जयंत पाटील होते ?’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

Pune Crime | लोणी काळभोर परिसरातील पत्त्याच्या जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा, 10 जणांना अटक

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News