CM Eknath Shinde | अमित शहांसोबतच्या बैठकीत मोठा निर्णय, स्वत: मुख्यमंत्र्यांनी ट्विट करुन दिली माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली. रविवारी रात्री त्यांच्यामध्ये बैठक पार पडली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत (Maharashtra Cabinet Expansion) चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनी अमित शहांसोबत झालेल्या बैठकीत काय घडलं याची माहिती ट्विटकरुन दिली. आगामी सर्व निवडणुकीत भाजप-शिवसेना (BJP-Shiv Sena Alliance) एकत्र लढवणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याची माहिती एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली.

व्हिडिओ पहाण्यासाठी क्लिक करा

https://twitter.com/mieknathshinde/status/1665591998861160449?s=20

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) ट्विटमध्ये म्हणाले की, काल, रविवारी रात्री मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या बैठकीत राज्यातील आगामी लोकसभा (Lok Sabha), विधानसभा (Legislative Assembly), स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body Election) शिवसेना आणि भाजप एकत्र लढवण्यावर निर्णय झाला.

याशिवाय कृषि, सहकार विभागाशी संबंधित विविध बाबींवर आम्ही चर्चा केली. राज्यात शेतकरी, महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रात गतीने कामे सुरू असून अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लावले आहेत. राज्यातील विविध प्रकल्पांसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे नेहमीच मार्गदर्शन लाभले आहे, सहकार विभागाशी संबंधित बाबींवर केंद्रीय सहकार मंत्री शाह यांचे आम्हाला नेहमीच मार्गदर्शन लाभत असल्याने आम्ही ही भेट घेतली.

Advt.

महाराष्ट्राच्या विकासासाठी आमची युती ही भक्कम असून गेल्या 11 महिन्यांपासून आम्ही विकासाचे विविध
निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली आहे, रखडलेले प्रकल्प मार्गी लावत आहोत.
यापुढच्या काळात सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राला देशात प्रथम क्रमांकाचे राज्य बनविण्यासाठी, विकासाची घोडदौड
अशीच सुरू ठेवण्यासाठी आम्ही एकत्रित निवडणुका लढविणार आणि बहुमताने जिंकणार,
असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

Web Title : CM Eknath Shinde | A big decision was taken in the meeting with Amit Shah, the Chief Minister himself tweeted the information

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Gold Rate Today | सोन्या-चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या पुण्यातील आजचे दर

Pune Police News | पुणे पोलिस : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते 5 कोटी 75 लाख रुपयांचा मुद्देमाल नागरिकांना हस्तांतरीत

Gufi Paintal Passes Away | महाभारतात शकुनी मामाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते गुफी पेंटल यांचं 78 व्या वर्षी निधन