CM Eknath Shinde | भंडारा डोंगर येथे सर्वांच्या प्रयत्नाने संत तुकाराम महाराजांचे भव्य मंदिर उभे राहील- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
159
CM Eknath Shinde | A grand temple of Sant Tukaram Maharaj will be erected at Bhandara Dongar with everyone's efforts - Chief Minister Eknath Shinde
file photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी श्री क्षेत्र भंडारा डोंगर (Shri Kshetra Bhandara Dongar) येथील श्री संत तुकाराम महाराज (Shri Sant Tukaram Maharaj) मंदिरात सुरू असलेल्या माघ दशमी सोहळ्यात सहभाग घेतला. महाराष्ट्रातील तीर्थस्थाने भव्य दिव्य व्हावीत अशी सर्वांची भावना असून श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे सर्वांच्या प्रयत्नाने श्री संत तुकाराम महाराजांचे भव्य मंदिर उभे राहील. मंदिर उभारण्याशी निगडीत अडचणी दूर केल्या जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यावेळी म्हणाले.

 

यावेळी खासदार श्रीरंग बारणे (MP Srirang Barane), आमदार संजय शिरसाठ (MLA Sanjay Shirsath), भरत गोगावले (Bharat Gogavle), माजी मंत्री बाळा भेगडे (Former Minister Bala Bhegde), मंदिर समितीचे अध्यक्ष ह.भ.प.बाळासाहेब काशिद पाटील (Balasaheb Kashid Patil)आदी उपस्थित होते.

 

संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीला वंदन करायला आणि वारकऱ्यांना भेटायला आल्याचे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले, संत तुकोबारायांच्या दर्शनासाठी भंडारा डोंगर येथे छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आले होते. अशा पावन भूमीत येण्याचे भाग्य आपल्याला मिळाले आहे. भंडारा डोंगर आगळ्यावेगळ्या ऊर्जेने भरला आहे. या परिसराचा विकास करताना या श्रद्धास्थानाचे पावित्र्य कायम राहिले पाहिजे. विकासकामे करताना वारकऱ्यांच्या श्रद्धेला ठेच लागू देणार नाही. त्यामुळेच रिंगरोडच्या मार्गातही बदल करण्यात आला. अयोध्येतील श्रीराम मंदिराप्रमाणे (Sriram Temple in Ayodhya) जगातील अतिशय भव्य मंदिर इथे उभे राहिल. श्रद्धा आणि तळमळ असल्यास अशी कामे उभी राहतात. श्री क्षेत्र भंडारा डोंगर परिसराचा चांगला विकास आराखडा तयार करावा, त्यासाठी शासनाचे सर्व सहकार्य राहील, असे शिंदे म्हणाले.

महाराष्ट्राला थोर संतांची परंपरा लाभली आहे. वारकरी संप्रदायाच्या रुपाने समाजाला दिशा देणारी  मोठी शक्ती महाराष्ट्रात आहे.
आपले सण, उत्सव, परंपरा पुढे नेण्याचे कार्य वारकरी संप्रदायाने केले आहे. ही परंपरा आपणही पुढे न्यायला हवी.
वारकरी संप्रदायाने समाजप्रबोधनाचे महत्वाचे कार्य सातत्याने केले आहे. आध्यात्मिक विचाराने जीवन सफल होतं.
आध्यात्मिक सोहळ्यातून अनेकांच्या जीवनामध्ये आमुलाग्र बदल घडून जीवन सुखी, समृद्ध आणि संपन्न होत असते.
उभारण्यात येणाऱ्या भव्य मंदिरापासून भक्ती, श्रद्धा, मांगल्याची भावना आणि प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

खासदार बारणे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
पालखी मार्गाचे काम आणि पंढरपूर विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतल्याचे त्यांनी सांगितले.
तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी श्री संत तुकाराम महाराज मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले आणि
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या भव्य मंदिर उभारणीच्या कामाची पाहणी केली.
श्री संत तुकाराम महाराजांच्या भव्य मंदिरासाठी वारकरी दत्तात्रेय कराळे यांनी पाच लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला.
प्रास्ताविकात काशिद पाटील यांनी श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे उभारण्यात येणाऱ्या श्री संत तुकाराम महाराजांच्या भव्य मंदिराच्या कामाची माहिती दिली.

 

Web Title :- CM Eknath Shinde | A grand temple of Sant Tukaram Maharaj will be erected at Bhandara Dongar with everyone’s efforts – Chief Minister Eknath Shinde

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Supriya Sule | धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या संत तुकाराम महाराजांवर केलेल्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे संतापल्या; म्हणाल्या…

Dhirendra Krishna Shastri | संत तुकाराम महाराजांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यावर देहू संस्थान विश्वस्तांची नरमाईची भूमिका?; म्हणाले…

Lingayat Samaj Protest | मुंबईतील लिंगायत समाजाचा मोर्चा स्थगित, 70 ते 80 टक्के मागण्या पूर्ण

Australian Open | जोकोविचने 22 वे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावून राफेल नादालच्या ‘त्या’ विक्रमाशी केली बरोबरी