CM Eknath Shinde And Devendra Fadnavis Meet Amit Shah | गृहमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस नाही ? तर ‘या’ नेत्याचं नाव आघाडीवर, शिंदे-शहा भेटीची Inside Story

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – CM Eknath Shinde And Devendra Fadnavis Meet Amit Shah | महाराष्ट्र राज्य सरकारचे (Maharashtra State Government) नवीन मंत्रिमंडळ स्थापन करण्याच्या हालचाली दिल्लीत वेगाने घडत आहेत. काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) यांची भेट घेतली. या बैठकीत मंत्रिमंडळ आणि खातेवाटपावर सविस्तर चर्चा झाली असून गृहमंत्रीपद (Maharashtra Home Minister) कुणाला मिळणार, कुणाला किती मंत्रिपदे मिळणार हे सुद्धा ठरल्याचे सूत्रांकडून समजते. रात्री साडेनऊ वाजता सुरू झालेली ही बैठक रात्री उशिरा 2 वाजता संपली.

 

राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, राज्याच्या गृहमंत्रीपदासाठी चंद्रकात पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. खरे तर देवेंद्र फडणवीस यासाठी इच्छूक असल्याचे बोलले जात होते. परंतु आता हे मंत्रिपद चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना मिळण्याची दाट शक्यता आहे. सहकार आणि अर्थ खाते सुद्धा भाजपाला हवे आहे.

 

दरम्यान, चंद्रकांत पाटील मंत्रिमंडळात सहभागी झाल्यास त्यांच्याकडील प्रदेशाध्यक्ष पद ओबीसी नेत्याला मिळू शकते. आगामी महापालिका निवडणुकांसाठी भाजपा ओबीसी चेहरा पुढे करू शकते, असे सूत्रांकडून समजते.

 

शिंदे गटाला 13 मंत्रिपदे मिळू शकतात तर उर्वरीत मंत्रिपदे भाजपाला मिळतील.
आज सायंकाळी शिंदे – फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतील. यानंतर महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ निश्चित होईल.
यामुळे शपथविधी सोमवार किंवा त्यानंतर होऊ शकतो.

 

शिंदे – फडणवीस यांच्या शपथविधीला आता आठवडा झाला आहे. मात्र, अजूनही मंत्र्यांचा शपथविधी आणि खातेवाटप झालेले नाही.

 

Web Title :- maharashtra cm eknath shinde and devendra fadnavis meet amit shah disscuss about cabinet expansion and new home minster

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा