CM Eknath Shinde And Uddhav Thackeray Net Worth | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे किती संपत्ती आहे माहितीय ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – CM Eknath Shinde And Uddhav Thackeray Net Worth | शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर सुरू झालेले राजकीय नाट्य आता शेवटच्या टप्प्यात आले आहे. शिंदे मुख्यमंत्री तर फडणवीस (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री झाले आहेत. परंतु आता न्यायालयीन लढाई करण्याच्या तयारीत शिवसेना (Shivsena) असल्याने 11 जुलैपासून राजकारणाला वेगळेच वळण लागण्याची शक्यता. सध्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांची चर्चा सर्वत्र आहे.

 

दरम्यान, संत्तातराच्या नाट्यात मोठ्याप्रमाणात पैसा खर्च झाल्याची चर्चा आणि अंदाज मध्यंतरी वर्तवले जात होते. यातून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Net Worth) यांच्याकडे किती पैसे आहेत किंवा त्यांची मालमत्ता किती, अशीही उत्सुकता अनेकांना आहे. तर या मोठ्या नेत्यांची मालमत्ता किती आहे ते जाणून घेवूयात.

 

एकनाथ शिंदे इतक्या कोटीचे मालक (Eknath Shinde Net Worth)

निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, शिंदे यांच्याकडे 11,56,12,466 रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता आहे.

पत्नीच्या खात्यात 32,64,760 रुपये रोख होते.

शिंदे दाम्पत्याने जीवन विम्यात 50,08,930 रुपयांची गुंतवणूक केल्याचे शपथपत्रात नमूद केले आहे.

शिंदे दाम्पत्याकडे 7 वाहने आहेत.

 

Ajit Pawar | शिंदे सरकारला अजित पवारांचा इशारा; म्हणाले – ‘एकही कायदा…’

 

शिंदे यांच्याकडं रिव्हॉल्व्हर आणि एक पिस्तूलही आहे. या दोन्हींची किंमत 4.75 लाख रुपये आहे.

शिंदे दाम्पत्याकडे 9,45,50,000 रुपयांची स्थावर मालमत्ता. 4,47,50,000 रुपयांची जंगम मालमत्ता.

पत्नीकडे 4,98,00,000 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता.

 

उद्धव ठाकरेंकडे आहे इतकी मालमत्ता

उद्धव ठाकरे 2020 मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे 143 कोटी 26 लाख रुपयांची मालमत्ता आहे.

15 कोटी 50 हजार रुपयांचे दायित्वही आहे.

दोन बंगल्यांचे मालक आहेत.

76.59 कोटी रुपयांची संपत्ती, त्यापैकी 52.44 कोटी रुपये स्थावर आणि 24.14 कोटी रुपये जंगम मालमत्ता आहे.

पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडे 65.09 कोटी रुपयांची मालमत्ता. त्यापैकी 28.92 कोटी रुपयांची स्थावर आणि 36.16 कोटींची जंगम मालमत्ता.

 

Web Title :- CM Eknath Shinde And Uddhav Thackeray Net Worth | Know the Net Worth property of cm of eknath shinde and shivsena chief uddhav thackeray

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा