CM Eknath Shinde | जितेंद्र आव्हाड यांच्यावर झालेली कारवाई राजकीय सुडापोटी नाही – CM एकनाथ शिंदे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे (NCP) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याला त्यांनी सरकारला जबाबदार धरले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील सरकारने राजकीय सुडापोटी माझ्यावर ही कारवाई केल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केला आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही कोणत्याही सुडापोटी ही कारवाई करत नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा दिला की नाही, हे मला माहीत नाही. पोलीस या प्रकरणात नियमानुसार चौकशी करतील. त्यांच्यावर कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई झाली आहे. संबंधित महिलेच्या तक्रारीत तथ्य असेल, तर पोलीस आपले काम करतील. आम्ही कोणावरही कोणत्याही सुडापोटी कारवाई करत नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यावेळी म्हणाले.

रविवारी ठाण्यात खाडीवरील एका पुलाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री शिंदे हजर होते. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे (Shrikatn Shinde), आमदार जितेंद्र आव्हाड, संबंधित महिला रीदा रशीद (Rida Rashid) आणि
इतर लोक उपस्थित होते. पिडीत महिलेने दाव्यानुसार, त्या ज्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना
भेटण्यासाठी त्यांच्या गाडीजवळ जात होत्या, तेव्हा जितेंद्र आव्हाड यांनी चुकीच्या पद्धतीने त्यांच्या खांद्याला
स्पर्श करुन त्यांना बाजुला काढले. त्यामुळे त्यांनी स्थानिक पोलिसांत जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार केली आहे.
आव्हाड यांच्यावर भा. द. वि. 354 (Indian Penal Code) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आव्हाड यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. माझ्यावर एक वेळ खुनाचा गुन्हा दाखल केला असता,
तर तो मी मान्य केला असता. पण, माझा जन्म 354 साठी झाला नाही.
राज्य सरकार सुडाच्या भावनेने माझ्यावर ही कारवाई करत आहे. त्यांना विरोधकांचा आवाज दाबायचा आहे.
त्यामुळे मला यात गोवण्यात आले आहे, असे आव्हाड म्हणाले आहेत.

Web Title :-  CM Eknath Shinde | ase of molestation has been filed against jitendra awad chief minister eknath shinde has reacted to this

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jitendra Awhad | ‘एकवेळ खुनाचा गुन्हा चालला असता, पण माझा जन्म 354 साठी झालेला नाही’ – आ. जितेंद्र आव्हाड

Pune Crime | डोनेशन मिळवण्यासाठी बँकेच्या पैशांमध्ये अपहार, गुन्हे शाखेकडून बँकेच्या डेप्युटी मॅनेजरसह तिघांना अटक; 2 कोटींची रोकड जप्त