CM Eknath Shinde | ‘देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडेंवर प्रेम, दया, ‘करुणा’ दाखवली’ – एकनाथ शिंदे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात (Monsoon Session) सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच जुगलबंदी आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी पहायला मिळत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (NCP Leader Dhananjay Munde) यांना सणसणीत टोला लगावला आहे. धनंजय मुंडे घोषणाबाजी करताना एवढे ओरडत होते, की किती वर्षांचे शिवसैनिक (Shiv Sainik) आहेत असं वाटावं, पण तुमचाही इतिहास मला माहिती आहे, त्यावेळी आपल्या देवेंद्रजींनी (Devendra Fadnavis) थोडं प्रेम, दया, करुणा दाखवली, असं एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले. यावेळी करुणा या शब्दावरुन शिंदेंनी घेतलेल्या फिरकीवरुन सभागृहात एकच हशा पिकला.

 

शिंदे गटाच्या (Shinde Group) आमदारांना भाजपकडून (BJP) प्रत्येकी 50 कोटी रुपये देण्यात आल्याचा आरोप विरोधक सातत्याने करत आहेत. त्यातच आज अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विरोधकांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर उभे राहून घोषणाबाजी केली. ‘खाऊन खाऊन पन्नास खोके, माजलेत बोके माजलेत बोके…’, ‘गद्दारांची भाकरी भाजपची चाकरी’, ‘ईडी ज्यांच्या घरी,ते भाजपच्या दारी’ अशा घोषणा देत विरोधकांनी शिंदे गटला टोला लगावला. त्यानंतर, सभागृहातही फटकेबाजी केली. धनंजय मुंडे यांनी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना ‘ऐकनाथ’ होऊ नका, असा टोला लगावला. यावर शिंदेंनी जशास तसं उत्तर दिलं.

एकनाथ शिंदे म्हणाले, बाहेर ओरडणाऱ्याकडे फक्त दोनच शब्द आहेत, यादोन शब्दांशिवाय यांच्याकडे दुसरं काय आहे.
धनंजय मुंडे परवा मोठ-मोठ्याने ओरडत होते, चलो गुवाहाटी… चलो गुवाहटी… असं म्हणत होते.
अगदी बेंबीच्या देठापासून ते ओरडत होते. जणू काय ते खूप वर्षांपासूनचे शिवसैनिक आहेत.
आता, यांच्याबद्दल काय बोलावं, तुमचा सगळा प्रवास मला माहितीय, अशी टीका त्यांनी मुंडेंवर केली.
देवेंद्र फडणवीसांनी तुमच्यावर तेव्हा प्रेम, दया, करुणा दाखवली. पण, परत परत ती दाखवता येणार नाही,
असे म्हणत शिंदे यांनी सभागृहात तुफान फटकेबाजी केली.

 

Web Title :- CM Eknath Shinde | BJP leader devendra fadnavis showed love mercy karuna to dhananjay mude eknath shinde stormed

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Navneet Rana | नवनीत राणांच्या खासदारकीमागे नेमके कुणाचे आशीर्वाद? शरद पवार की भाजपा नेते देवेंद्र फडणवीस?

 

CM Eknath Shinde | नगराध्यक्ष, सरपंच निवड थेट जनतेतून ही जनतेचीच मागणी, आमचा अजेंडा नाही; मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

 

Mohit Kamboj-Rohit Pawar | ट्विट करत मोहित कंबोज म्हणाले – ‘बारामती अ‍ॅग्रो कंपनीचा…’