CM Eknath Shinde | एकनाथ शिंदेंवर त्यांचे आमदार नाराज; ठाकरे गटाच्या नेत्यानं सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेत एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बंडाला सुरुवात केली आणि एक एक म्हणत आमदार तसेच खासदारांची शिंदे यांच्या तंबूकडे रीघच लागली. त्यामुळे शिवसेना आता केवळ मोजक्या आमदार आणि खासदारांचा पक्ष राहिला आहे. पण, शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटात गेलेले आमदार आता त्यांच्यावर नाराज असल्याचे शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले आहे. शिंदे गटाचे आमदार अस्वस्थ आहेत. हे आमदार कोणत्याही क्षणी फुटण्याची शक्यता आहे. शिंदे गटातील आमदार फुटू नयेत म्हणून या आमदारांना पुन्हा प्रत्येकी 5 कोटी रुपये देण्यात आले आहेत, असा गौप्यस्फोट चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

 

चंद्रकांत खैरे म्हणाले, एका उद्योगपतीने मला ही माहिती दिली. शिंदे गटातील नाराज आमदारांना रोखण्यासाठी मंत्रिपदाचे गाजर दाखवून काही उपयोग होत नाही. मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर चालला आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा पाच पाच कोटी दिले गेले आहेत. (CM Eknath Shinde)

यावेळी त्यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावरदेखील आरोप केले. कृषिमंत्री अब्दुल सत्तार केवळ आपल्या मर्जीतील कृषी आयुक्त कसा येईल, याकडे लक्ष देत आहेत. हे सरकार केवळ खोके घेण्यात व्यस्त आहे. शेतकऱ्यांना काहीही मदत केली जात नाही. ऐन रब्बी हंगामात त्यांची वीज तोडण्यात आली आहे, असे खैरे यांनी सांगितले.

 

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मात्र हा दावा खोडून काढला आहे.
आम्ही पाच कोटी घेतले हे काय कोणी मोजायला आले होते का, असा प्रश्न गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला आहे.
बंडाच्या वेळी आम्ही कामाख्या देवीला नवस केला होता
राज्यात शिवसेना आणि भाजपचे सरकार येऊ दे, अशी आमची देवीला प्रार्थना होती. ती फळाला आली,
त्यामुळे आम्ही पुन्हा देवीचा नवस पूर्ण करण्यासाठी गेलो होतो, असे पाटील म्हणाले.

 

Web Title :- CM Eknath Shinde | chandrakant khaire criticize eknath shinde over guwahati tour

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Thane Measles Update | मुंबईपाठोपाठ ठाणेसुद्धा ‘गोवर’च्या विळखेत; मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्यात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू

Pravin Darekar | 123 कोटींच्या कथित घोटाळ्याप्रकरणी मुंबै बँकेचे अध्यक्ष भाजप आमदार प्रवीण दरेकरांना आरोपपत्रातून वगळले

Sanjay Raut | ‘शिवसेना सोडली आणि हेमंत गोडसे यांची कारकीर्द संपली, त्यांनी स्वत:च स्वत:ची कबर खोदली’ – संजय राऊत