CM Eknath Shinde | शिंदे-ठाकरे उद्या पुण्यात आमने-सामने, दोन्ही गटांच्या समर्थकांकडून जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील राजकीय घडामोडीच्या पर्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे (Yuvasena Chief Aditya Thackeray) उद्या एकाच दिवशी एकाच वेळी पुणे (Pune) दौऱ्यावर येणार आहेत. या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शनाची तयारी सुरु केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि आदित्य ठाकरे हे राजकीय परिस्थिती बदलानंतर पहिल्यांदाच पुणे दौऱ्यावर येणार असल्याने शहरातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) पुणे दौऱ्यावर येणार आहे. या निमित्त ते सासवड येथे सभा घेणार आहेत. माजी आमदार विजय शिवतारे (Former MLA Vijay Sivatare) यांच्या मतदारसंघात ही सभा होणार आहे. तर आदित्य ठाकरे यांची सध्या निष्ठा यात्रा सुरु आहे. बंड केलेल्या आमदारांच्या जिल्ह्यात ठाकरे फिरत आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या 7 वाजता पुण्यातील कात्रज चौकामध्ये (Katraj Chowk) आमदार तानाजी सावंत (MLA Tanaji Sawant) यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत. त्याचवेळी आदित्य ठाकरे कात्रजमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे हे एकाच दिवशी पुण्यात येणार आहेत.
दोन्ही नेत्याच्या सभांच आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे काय बोलणार,
याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर असल्याने आदित्य ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

 

Web Title :- CM Eknath Shinde | chief minister eknath shinde and shiv sena leader aditya thackeray on pune visit tomorrow

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shahajibapu Patil | ‘ठाकरी भाषा फक्त शिवसेनाप्रमुखांनाच शोभते, कोणी पोराने ती वापरू नये’; शहाजीबापू पाटलांचा आदित्य ठाकरेंना टोला

 

Pune Crime | सराईत गुन्हेगाराकडून 5 पिस्तूल व 14 काडतुसे जप्त, विमानतळ पोलिसांची मोठी कारवाई

 

BJP PM Candidate 2024 | नरेंद्र मोदीच असणार भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार, जाणून घ्या अमित शाह यांनी काय म्हटले