CM Eknath Shinde | अतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा, 755 कोटींची मदत जाहीर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – CM Eknath Shinde | अतिवृष्टीसाठी (Heavy Rain) विहित करण्यात आलेल्या निकषांमध्ये बसत नसतानाही जून ते ऑगस्ट 2022 या कालावधीत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना (Farmers) राज्य शासनाने (State Government) मोठा दिलासा दिला आहे. विशेष बाब म्हणून सुमारे 755 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत (Cabinet Sub-Committee Meeting) गुरुवारी (दि.29) घेण्यात आला. याचा राज्यातील अंदाजे 5 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.

 

नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित आपद्ग्रस्तांना मदत देण्याबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज मंत्रालयात झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचेसह ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि अपर मुख्य सचिव (वित्त) मनोज सौनिक, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले आदी वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी आतापर्यंत अंदाजे 4500 कोटी रुपयांच्या निधीचे शासनाने वाटप केले आहे. एसडीआरएफच्या (SDRF) निकषाप्रमाणे जर मदतीचे वाटप केले असते तर ती अवघी 1500 कोटी रुपये राहिली असती, असे सांगून निकषापलिकडे जाऊन अधिक मदत करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्याचा भरीव लाभ मिळणार असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

 

काही गावांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीसाठी विहित करण्यात आलेल्या निकषामध्ये बसत नसतानाही या झालेल्या नुकसानीपोटी मदतीचे प्रस्ताव विभागीय आयुक्त औरंगाबाद, अमरावती आणि सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे सादर केले होते. औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, लातूर, उस्मानाबाद, या जिल्ह्यातील 4 लाख 38 हजार 498 हेक्टर क्षेत्र, यवतमाळ जिल्ह्यातील 36 हजार 711.31 हेक्टर तर सोलापूर जिल्ह्यातील 74 हजार 446 हेक्टर असे एकूण 5 लाख 49 हजार 646.31 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना सुमारे 755 कोटी रुपयांच्या निधीची मदत देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळ उपसमितीने मान्य केला आहे. या निर्णयाचा सुमारे 5 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.

 

अंदाजे 36 लाख शेतकऱ्यांना दिलासा

आतापर्यंत सुमारे 3900 कोटी रुपयांच्या मदतीचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाटप केले आहे, काही ठिकाणी हे मदतीचे वाटप सुरु असून सुमारे 30 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आहे, हे 30 लाख आणि आज मदतीचा निर्णय घेण्यात आलेल्या 755 कोटीच्या निधीमुळे अंदाजे 36 लाख शेतकऱ्यांना शासनाच्या या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

 

आतापर्यंत सुमारे 3954 कोटी रुपयांचा मदत निधी वितरित

राज्यात जून ते ऑगस्ट या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे आणि मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत देण्याचे प्रस्ताव सर्व विभागीय आयुक्तांकडून शासनास प्राप्त झाले होते.
त्यानुसार 8 सप्टेंबर 2022 रोजी सुमारे 3445.25 कोटी आणि 56.45 कोटी इतका निधी नुकसानभरपाई पोटी शेतकऱ्यांना वितरित करण्यास मान्यता दिली आहे.
त्याशिवाय गोगलगायींमुळे झालेल्या नुकसानीपोटी औरंगाबाद विभागास 98.58 कोटी तर नाशिक,
अमरावती, पुणे यांच्या सुधारित प्रस्तावानुसार 354.07 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास यापूर्वीच मान्यता देण्यात आली आहे.

 

मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्णयाचा ‘या’ जिल्ह्यांना होणार लाभ

– औरंगाबाद – १२,६७९ हेक्टर क्षेत्र
– जालना- ६७८ हेक्टर क्षेत्र
– परभणी- २५४५.२५ हेक्टर क्षेत्र
– हिंगोली- ९६,६७७ हेक्टर क्षेत्र
– बीड- ४८.८० हेक्टर क्षेत्र
– लातूर- २,१३,२५१ हेक्टर क्षेत्र
– उस्मानाबाद- १,१२,६०९.९५ हेक्टर क्षेत्र
– यवतमाळ- ३६,७११.३१ हेक्टर क्षेत्र
– सोलापूर- ७४,४४६ हेक्टर क्षेत्र

 

Web Title :- CM Eknath Shinde | chief minister eknath shinde announced a
relief of rs 755 crore to farmers affected by heavy rain flood

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा