CM Eknath Shinde | राजकीय क्षेत्रात खळबळ ! CM एकनाथ शिंदेंच्या PA कडून धमकीचा फोन?,

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – CM Eknath Shinde | राज्यातील राजकारणाने आता सुडाचे वळण घेतल्याचे दिसत आहे. मागील सरकारचे लोकहिताचे निर्णय रद्द करण्याचा सपाटा नवीन शिंदे सरकारने लावला आहे. त्यातच आता त्यांच्या पीएने धमकी दिल्याच्या प्रकरणाने खळबळ माजली आहे. (CM Eknath Shinde)

 

नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वीय सहाय्यकाने फोन करून धमकी दिल्याचा आरोप शिवसेनेचे जळगाव सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी केला आहे. जळगाव जिल्ह्यातील बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसेनेने आयोजित केलेल्या भव्य आक्रोश मोर्चादरम्यान हा गंभीर प्रकार घडला.

 

या आक्रोश मोर्चा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन मोर्चात सहभागी होत असताना सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांना मोबाइलवर फोन आला. पलिकडील व्यक्ती म्हणाला, मी एकनाथ शिंदे यांचा पीए बोलतोय. तुम्ही आमदारांचा विरोध का करत आहात. विरोध करायचा नाही, नाहीतर तुम्हाला जीवानीशी मारू. (CM Eknath Shinde)

हा प्रकार घडल्यानंतर आक्रोश मोर्चात बोलताना गुलाबराव वाघ यांनी ही माहिती दिली.
ते म्हणाले, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. तुम्हाला जे करायचे ते करा, बंडखोराचा यापुढेही विरोध करत राहणार.

 

गुलाबराव वाघ यांनी सांगितले की, बंडखोरांच्या विरोधात शिवसैनिक एकवटले आहेत आणि त्यांची एकजूट यापुढेही अशीच कायम राहील.
या धमकीप्रकरणी पोलिसांकडे तक्रार करणार आहोत. तर, शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत म्हणाले
की, आमच्या कोणत्याही कार्यकर्त्याला हात लावला तर आम्ही एकालाही सोडणार नाही.

 

Web Title :- CM Eknath Shinde | chief minister eknath shinde pa threatening phone call allegation of shivsena leader gulabrao wagh jalgaon

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sanjay Raut On Devendra Fadnavis | ‘बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद जर तुम्हाला खरोखर लाभले असते, तर…’

 

Pune Crime | पुण्यात शेततळ्यात बडून दोघा मुलांचा मृत्यु; धायरीतील खंडोबा देवस्थान माळ येथील घटना

 

Child Saving Plan | आई-वडिलांनी ‘या’ योजनेत रोज जमा करावे अवघे 67 रुपये, 5 वर्षात तुमचे मुल होईल लखपती