CM Eknath Shinde | ‘मेरे बेटे, बेटे होने से मेरे उत्तराधिकारी नही होंगे, जो…’ दसरा मेळाव्याच्या भाषणापूर्वी एकनाथ शिंदेंचे सूचक ट्विट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – CM Eknath Shinde | खरी शिवसेने (Shivsena) कोणाची? उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची की एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची हे प्रकरण सध्या सुप्रीम कोर्टात (Supreme Court) असले तरी त्याचा फैसला आज सायंकाळी मुंबईत आयोजित दोन दसरा मेळाव्यांच्या (Dasara Melava 2022) निमित्ताने ‘जनता की अदालत’मध्ये (Janata Ki Adalat) होणार आहे. मुंबईतील शिवतिर्थ (Shivatirtha) आणि बीकेसी मैदानात (BKC Ground)मागील काही दिवसांपासून जोरदार तयारी सुरु झाली असून सकाळपासून शिवसैनिक (Shiv Sainik) जमण्यास सुरुवात झाली आहे.

शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गट (Thackeray Group) या दोन्ही गटांनी आपल्या मेळाव्यांना तुफान गर्दी करण्यासाठी कंबर कसली आहे. जास्त गर्दी कोणाच्या मेळाव्याला होणार, याबाबत कमालीची उत्सुकता लागली आहे. उद्धव ठाकरे यांचा शिवाजी पार्क तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा बीकेसी मैदानावर दसरा मेळावा होणार आहे. यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक मुंबईत दाखल होत आहेत. आजच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे एकमेकांना जोरदार प्रत्युत्तर देणार असून यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.

दसरा मेळाव्याच्या भाषणाआधी एकनाथ शिंदे यांनी एक ट्विट केले आहे.
यामध्ये ‘मेरे बेटे, बेटे होने से मेरे उत्तराधिकारी नहीं होंगे, जो मेरे उत्तराधिकारी होंगे, वो मेरे बेटे होंगे’,
भारतीय कवी आणि लेखक हरिवंशराय बच्चन (Harivansh Rai Bachchan) यांच्या दोन ओळी लिहिल्या आहेत.
तसेच विचारांचे वारसदार असंही म्हटलं आहे.

Web Title :- CM Eknath Shinde | chief minister eknath shinde tweeted before the dussehra meeting to be held today

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Mukesh Ambani | मुकेश अंबानी आणि नीता अंबांनी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी, अँटिलिया निवासस्थानाची सुरक्षा वाढवली

Pankaja Munde | पंकजा मुंडेंच्या भाषणानंतर पोलीस-कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, पोलिसांचा लाठीचार्ज