CM Eknath Shinde | ‘पुन्हा एखादा OK मधी सगळं’??; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या आमदारांना घेऊन पुन्हा गुवाहाटी येथे जाणार

0
1216
CM Eknath Shinde | chief minister eknath shinde will go to guwahati on november 21 with 50 mlas
file photo

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – 3 महिन्यांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरचे नाटक अजून कोणीही विसरले नसताना. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM eknath Shinde) त्यांच्या आमदारांना घेऊन पुन्हा गुवाहाटी येथे जाणार आहेत. गुवाहाटीतील एका हॉटेलमध्येच राज्यातील सत्तानाट्य घडले होते. येत्या 21 नोव्हेंबर रोजी पुन्हा सर्व आमदार, एकनाथ शिंदेंसह (CM Eknath Shinde) गुवाहाटीला (Guwahati) जाणार असल्याचे निश्चित झाले आहे.

सत्तांतराच्या काळात मुख्यमंत्री शिंदेनी कामाख्या देवीच्या (kamakhya Devi) दर्शनाला जाऊन मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा दर्शनाला येईन, असा नवस देवीला बोलला होता. त्यामुळेच मुख्यमंत्री सर्व खासदार (MP), आमदार (MLA) आणि पदाधिकाऱ्यांना घेऊन कामाख्या देवीचे दर्शन घेणार आहे. हा एक दिवसाचा हा दौरा असेल. दौऱ्यासाठी पूर्वतयारी सुरू करण्यात आली असून, सर्वांना याबद्दल सूचना देण्यात आल्या आहेत.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत (Mumbai Municipal Elections) शिंदे गटाचा (Shinde Group)
विजय व्हावा, यासाठी एकनाथ शिंदे (CM eknath Shinde) हे त्या ठिकाणी विशेष पूजा करणार असल्याची
माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शिवसेनेमध्ये (Shivsena) बंडखोरी करून शिंदे आपल्या आमदारांसह
गुवाहाटीला मुक्कामी होते. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिंदे सर्व आमदारांना घेऊन कामाख्या देवीच्या दर्शनाला गेले होते. तिथून ते आमदारांना घेऊन गोव्यात आले आणि मग मुंबईत पोहोचले होते.

Web Title :- CM Eknath Shinde | chief minister eknath shinde will go to guwahati on november 21 with 50 mlas

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update