CM Eknath Shinde | गणेशभक्तांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा ! गणेश भक्तांच्या वाहनांना मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मिळणार ‘ही’ खास सुविधा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गणेशोत्सवासाठी (Ganeshotsav 2022) जाणाऱ्या वाहनांसाठी मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील (Mumbai-Pune Expressway) टोलनाक्यांवर स्वतंत्र मार्गिका करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी रविवारी (दि.28) दिले. खालापुर टोलनाक्याला भेट दिल्यानंतर याठिकाणी अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ह्या सूचना दिल्या.

 

सण-उत्सव,सुट्ट्यांच्या काळात या द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी आणि पथकर नाक्यावर होणारी गर्दी टाळण्यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ वाढवावे. सीसीटीव्ही यंत्रणा सक्षम करण्याबरोबरच अपघात टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी  दिले.

 

साताऱ्याहून मुंबईकडे परतताना दुपारी पुण्यातील चांदणी चौक (Chandni Chowk in Pune) परिसराला भेट दिल्यानंतर त्यांनी मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरील खोपोली Khopoli (खालापूर) टोलनाक्याला भेट दिली.
याभागात होणाऱ्या वाहतूक कोंडीचा (Traffic Congestion) मुख्यमंत्र्यानी आढावा घेतला.
महामार्गांवर होणाऱ्या वाहतूक कोंडीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गांभीर्याने दखल घेतली.
आज दुपारी त्यांनी पुण्यातील चांदणी चौक परिसराला भेट दिली.
या भागात होणाऱ्या वाहतूक कोंडीसंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील खोपोली (खालापूर) टोलनाक्यालाही मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. याभागात होणाऱ्या वाहतूक कोंडीचा त्यांनी आढावा घेतला.
गणेशोत्सव, शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या काळात याठिकाणी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी टोल नाक्यांवर ट्रॅफिक वॉर्डन (Traffic Warden)
त्याचबरोबर टोल वसूल करण्यासाठी आवश्यक ते स्कॅनिंग मशिन्सची (Scanning Machines) संख्या वाढवावी,
असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी महामार्ग पोलिस (Highway Police) आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (Maharashtra State Road Development Corporation (MSRDC)
वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत दिले.

 

सीसीटीव्ही यंत्रणा सक्षम करण्याबरोबरच अपघात टाळण्यासाठी रस्ता सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याकरिता तातडीने उपाययोजना हाती घ्याव्यात असे सांगत वाहतूक कोंडीतून प्रवाशांना दिलासा देण्यासाठी यंत्रणेने जलदगतीने कार्यवाही करण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 

Web Title : – CM Eknath Shinde | Chief Minister’s big announcement for Ganesh devotees Vehicles of Ganesha devotees will get this special facility on the Mumbai-Pune expressway

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा