CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि काँग्रेसचे विश्वजीत कदम यांच्यात बंद दाराआड चर्चा, राजकीय वर्तुळात खळबळ

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे आज पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी कोल्हापूर (Kolhapur) आणि सांगली (Sangli) जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सांगलीत आले असताना मोठी राजकीय घडामोड घडल्याची माहिती समोर आली आहे. सांगली जिल्ह्याचे काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम (Congress MLA Vishwajit Kadam) आणि एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यामध्ये बंद दाराआड अर्धातास चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या दोन नेत्यांच्या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सांगलीत राजकीय भूकंप घडणार की काय? अशा चर्चांना सुरुवात झाली आहे.

 

विश्वजीत कदम हे सांगली जिल्ह्यातील पलुस-कडेगांव विधानसभा मतदारसंघाचे (Palus-Kadegaon Assembly Constituency) आमदार आहेत. महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi Govt) असताना ते राज्यमंत्री होते. त्यांचे वडील स्व. पतंगराव कदम (Patangrao Kadam) हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. राज्याच्या राजकारणात त्यांचे एक महत्त्वाचे स्थान हेतं. पतंगराव यांचा जनमानसात दबदबा होता. त्यांच्या कार्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि सांगली जिल्ह्यातील लाखो मतदारांनी विश्वजीत कदम यांना पाठिंबा दिला. मात्र विश्वजीत कदम यांनी जर वेगळा मार्ग स्विकारला तर हे कार्यकर्ते त्यांची साथ देतील का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून अनपेक्षित घटना घडल्या आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे शिवसेनेत (Shivsena) बंड पुकारतील अशी कल्पना देखील नव्हती. पण त्यांनी शिवसेनेत बंड पुकारले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. तर शिंदे गटाने भाजपच्या (BJP) मदतीने राज्यात सरकार स्थापन केले. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मुख्यमंत्री होतील अशी अपेक्षा असताना एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली.

 

Web Title :- CM Eknath Shinde | cm eknath shinde and congress mla vishwajeet kadam meet in sangli

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sanjay Raut | कैदी नंबर 8959 ! आर्थर रोड कारागृहात संजय राऊत यांची नवी ओळख, जाणून घ्या कसे काढत आहेत दिवस

 

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची नवी रणनीती ? पक्ष कार्यकारिणीने घेतला ‘हा’ निर्णय

 

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सर्व पक्षातील आमदारांसाठी मोठी घोषणा