CM Eknath Shinde | ‘तुम्हाला चांगलं बोललं तरी …?’; एकनाथ शिंदेंचा राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराला खरमरीत टोला

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – नागपूर येथील हिवाळी अधिवेशन शेवटच्या टप्प्यात असून, विदर्भातील अनुशेष विषयावर यावेळी प्रश्न उत्तराच्या माध्यमातून चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विरोधकांच्या टीकेला सामोरे जाताना जशास दसे उत्तर दिले. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) आणि राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awad) यांच्यात शाब्दिक चकमक झाली. अध्यक्षांना यामध्ये मधस्थी करून या दोघांनाही शांत करावे लागले.

 

नेमकं काय घडलं?
मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) हे विदर्भातील अनुशेषाविषयी बोलत असताना त्यांनी राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांच्या नावाचा उच्चार केला. मी एमएसआरडीसीचा मंत्री (MSRDC) असताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मुख्यमंत्री पदावर होते. परंतु, माझ्याकडे जे खाते होते, त्या खात्याकडे कोणतेही काम नव्हते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांना मी म्हणालो, की मी काम करणारा कार्यकर्ता असून, माझ्याजवळ काहीच काम नाही. तेव्हा त्यांनी माझ्यावर समृद्धी महामार्गाची (Samruddhi Highway) जबाबदारी सोपवली. याविषयी आव्हाडांना माहिती होती. त्यामुळे ते सारखेच समृद्धी महामार्ग दिला आहे असे बोलायचे. एकनाथ शिंदे असे बोलल्यानंतर आव्हाडांनी आक्षेप घेत, मी असे कधी बोलोच नाही, असं म्हणाले. आव्हाडांना प्रत्युत्तर देतानाच मी चांगलं बोलायला गेलो तरी तुम्हाला आवडत नाही, अशी खरमरीत टीका मुख्यमंत्र्यांनी केली. यावेळी शिंदे आणि आव्हाडांमध्ये शाब्दिक चकमक बघायला मिळाली. शेवटी अध्यक्षांच्या मध्यस्थीने दोघांना शांत करण्यात आले.

मागील दोन वर्षांपासून विदर्भात अधिवेशन झाले पाहिजे, अशी मागणी केली होती.
नवीन सरकार जर आलं नसतं तर विदर्भात अधिवेशन झालंच नसतं.
चीन, कोरिया तसेच जपान येथील कोरोनाच्या वाढत्या रुग्णांचा अनुमान येथे लावला असता.
अजित पवारांना माहिती आहे, लॉकडाऊन आणि कोरोना हा कोणाच्या पसंतीचा विषय आहे,”
असा खोचक टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

 

Web Title :- CM Eknath Shinde | cm eknath shinde and jitendra awhad exchange word in assembly winter session

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MP Sanjay Raut | संजय राऊतांना भाजपच्या ‘या’ आमदाराचे थेट आव्हान, म्हणाले – ‘हिंमत असेल, तर…’

Ajit Pawar | ‘मी बिलंदर शब्द तुमच्यासाठी वापरणार नाही, पण…’ अजित पवारांचा फडणवीसांना खोचक टोला

MLA Sunil Tingre | नगर रस्त्यावरील बीआरटी काढा अन वाहतुक कोंडी सोडवा; आमदार सुनिल टिंगरे यांची लक्षवेधीतून विधानसभेत मागणी